३१ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३४ जणांनी माघार घेतल्याने ६२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
ओरोस : जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेची निवडणूक १५ जूनला होत आहे. १५ संचालक पदासाठी ९६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील ३४ जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
त्यामुळे ६२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. एकूण चार पॅनेल या निवडणूक रिंगणात उतरलेल्या असून, याव्यतिरिक्त चार अपक्ष उमेदवारसुद्धा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीसाठी अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श सहकार पॅनेल, संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनेल, दिनेश म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल, गजानन नानचे यांच्या नेतृत्वाखाली विद्या सहकार परिवर्तन पॅनेल अशा एकूण चार पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जात आहे.
या व्यतिरिक्त चार उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आठ तालुका मतदारसंघातून आठ, दोन जिल्हा सर्वसाधारण मतदारसंघ, दोन सर्वसाधारण महिला प्रतिनिधी, एक अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघ, एक इतर मागासवर्गीय मतदारसंघ, एक भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ अशा प्रकारे एकूण पंधरा संचालक निवडले जाणार आहेत.
आदर्श सहकार पॅनेलः महेंद्र देसाई (दोडामार्ग), प्रशांत सावंत (सावंतवाडी), गोपाळ हरमलकर (कुडाळ), आशिष शिरोडकर (वेंगुर्ले), संजय पेंडूरकर (मालवण), मारुती पुजारी (कणकवली), जयवंत पाटील (वैभववाडी), दत्ताराम कोकरे (देवगड), शिवराम सावंत व संदीप शिंदे (जिल्हा सर्वसाधारण), संदीप कदम (अनुसूचित जाती जमाती), अश्विनी गर्जे व स्वप्नीली घावरे (महिला प्रतिनिधी), अजय शिंदे (इतर मागास प्रवर्ग), पांडुरंग काळे (भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग).
सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनेलः शरद देसाई (दोडामार्ग), प्रदीप सावंत (सावंतवाडी), रमाकांत नाईक (कुडाळ), संदीप काळे (वेंगुर्ले), सुमित मसुरकर (मालवण), बयाजी बुराण (कणकवली), प्रतिभा कोकरे (वैभववाडी), सत्यपाल लाडगावकर (देवगड), समीर परब व स्वप्नील पाटील (जिल्हा सर्वसाधारण), सुनील जाधव (अनुसूचित जाती जमाती), सुमेधा नाईक व विद्या शिरसाट (महिला प्रतिनिधी), संजय वेतुरेकर (इतर मागास प्रवर्ग), सुरेंद्र लांबोरे (भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग).
शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेलः अर्जुन राणे (दोडामार्ग), शिवराम मोरजकर (सावंतवाडी), संतप्रसाद परब (कुडाळ), सुरेंद्र चव्हाण (वेंगुर्ले), संगम चव्हाण (मालवण), संतोष जोईल (कणकवली), अजित कदम (देवगड), दिनेश म्हाडगुत व एकनाथ राऊळ (जिल्हा सर्वसाधारण), आनंदा बामणोकर (अनुसूचित जाती जमाती), संगीता गावडे व सुषमा परब (महिला प्रतिनिधी), नारायण साळवी (इतर मागास प्रवर्ग), महादेव चौगुले (भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग).
विद्या सहकार परिवर्तन पॅनेलः शाबी तुळसकर (दोडामार्ग), लाडू जाधव (सावंतवाडी), सुनील जाधव (वेंगुर्ले), प्रदीप सावंत (मालवण), शरद चोडणकर (कणकवली), शरद कांबळे (वैभववाडी), पंढरीनाथ आचरेकर (देवगड), अनिल राणे व किशोर सोनसुरकर (जिल्हा सर्वसाधारण), संदीप सावंत (अनुसूचित जाती जमाती), धनश्री गावडे व सुविधा तावडे (महिला प्रतिनिधी), विष्णू काणेकर (इतर मागास प्रवर्ग), कमलेश गोसावी (भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग).
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेसाठी एकूण १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी १६०० मतदार निश्चित झाले आहेत. ३१ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३४ जणांनी माघार घेतल्याने ६२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. १५ जूनला आठ तालुक्यांत आठ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १६ जूनला सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील संस्थेच्या सभागृहात मतमोजणी करण्यात येणार आहे.
- ऊर्मिला यादव, निवडणूक निर्णय अधिकारी
सावंतवाडी तालुका मतदारसंघातून यादव ठाकरे, मालवण तालुका मतदारसंघातून जयवंत ठाकूर, जिल्हा सर्वसाधारण मतदारसंघातून रुपेश नेवगी, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून सूर्यकांत चव्हाण हे चार उमेदवार स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.