Ratnagiri : खेड कर्मचारी वसाहतीजवळ अतिक्रमण

पालिकेकडे कारवाईची पाटणे यांची मागणी; खोक्यांच्या अतिक्रमणामुळे वसाहतीला धोका
Ratnagiri
Ratnagiri sakal
Updated on

खेड : खेड नगरपालिकेच्या कर्मचारी वसाहतींमध्ये नव्याने अनधिकृत खोके उभारून संपूर्ण वसाहतीस धोका होईल, अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे. त्याकडे तातडीने लक्ष देऊन हे खोके हटवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिरीष पाटणे यांनी पालिकेकडे निवेदन देऊन केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिले आहे.

खेड शहरात पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून व्यावसायिक खोके उभारणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या प्रकरणी पाटणे यांनी पालिकेला निवेदन दिले आहे. शहरातील अनधिकृत खोक्याकडे लक्ष घालून ते खोके उठवणे गरजेचे आहे. खेड सिटी सर्व्हे नं. २५३२ ते २५४९ या भूमापन नंबरमध्ये समाविष्ट वसाहत ही पालिकेची कर्मचारी वसाहत आहे.

कर्मचारी वसाहत समर्थनगर साईमंदिरजवळ असून या वसाहतीतील ९ इमारती असून त्यातील एक पडीक आहे. १७ कुटुंबांची व्यवस्था असून त्याच्या पूर्वेकडील भागात जो मुख्य रस्ता जगबुडीकडे जातो त्याला लागून पूर्वी दोन खोकेवजा गाळे होते. आता ६ गाळ्यांची व्यवस्था करून ते कोणासाठी पालिका देणार, याचा उलगडा झालेला नाही. मर्जीतील कोणाला देण्यासाठी ही जागा आहे काय, असा प्रश्न पाटणे यांनी या निवेदनाद्वारे पालिकेला विचारला आहे.

ज. शि. पाटणे यांच्या नगरपालिका कारकिर्दीत ३६ गुंठे जागा १९५५ च्या सुमारास ३ हजार ६०० रुपये खर्च करून ही जागा खरेदी करून कर्मचारी वसाहत १९६०-६१ मध्ये पूर्ण करून घेण्यात आली आहे. ज्या व्यक्तींनी त्यासाठी योगदान दिले त्या व्यक्तींचा हा अपमान असून हे बेकायदेशीर गाळे काढण्यात यावेत.

तसेच या जागेमध्ये भविष्यात नगर पालिकेस काही मोठे बांधकाम प्रोजेक्ट करायचे असल्यास ते अडचणींचे ठरणार आहेत. आजसुद्धा या गाळ्यांमुळे वसाहतीमध्ये जरूर पडल्यास एखादे मोठे वाहन आणणेदेखील जमणार नाही. त्यामुळे हे गाळे ताबडतोब हटवावेत. तसेच या वसाहतीच्या पश्चिमेला एका लगतच्या हद्ददाराने जागेत १९ ते २० फूट आत येऊन अतिक्रमण केले आहे. पालिकेने हे अतिक्रमण हटवून भूखंड मोकळा करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.