उद्योजकतेसह हवी पर्यावरण सजगता

उद्योजकतेसह हवी पर्यावरण सजगता

Published on

(२९ मे टुडे ३ )


उद्योग साकारताना ......लोगो

- rat४p१.jpg-
२४M८७७०३
प्रसाद जोग

सजगता म्हणजे सतर्क असणे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींची दखल घेणे. वाढते तापमान, हवामान बदल, पर्यावरणात होणारे सूक्ष्म बदल, प्रदुषणात वाढ होण्याची कारणे असे घटक जर अभ्यासले गेले तर पर्यावरणस्नेही उद्योजकता का आवश्यक आहे याचे उत्तर आपले आपल्यालाच मिळू शकेल.

- प्रसाद जोग
उद्योगप्रेरणा प्रशिक्षक
theworldneedit@gmail.com


--------
उद्योजकतेसह हवी पर्यावरण सजगता

पर्यावरण समजून घेऊन त्याचा आदर राखून पर्यावरणपूरक किंवा पर्यावरणस्नेही उद्योग येणाऱ्या काळात कोकणात वाढीस लागावे असे वाटत असेल तर पर्यावरण आणि त्याचे येणाऱ्या उद्योजकतेवर होणारे परिणाम यांचे वास्तव समजून घेण्याची आजची परिस्थिती आहे. उद्योजक म्हणून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना हवामान बदल, पर्यावरणीय बदल यांचा सामना करत पर्यावरण वाचवण्यासाठी आपले दायित्व सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आत्ताच्या उद्योजकीय पिढीने अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. आज पाच जून ‘जागतिक पर्यावरणदिन’ या दिनाचे औचित्य साधून आपण एक उद्यमी म्हणून आपण निसर्गाकडून काय काय घेत आहोत व निसर्गाला आपण काय काय देत आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आहे. उत्पादनाची क्षमता आहे म्हणून एक उद्योजक म्हणून आपण अनिर्बंध उत्पादन करून ठेवत नाही? कारण, त्या वेळी आपण आपल्याकडे असणाऱ्या संसाधनांचा विचार करतो तसाच विचार प्रत्येक व्यक्तीने, उद्योजकाने आपण या पर्यावरणातील घटकांचा अनिर्बंध पद्धतीने वापर तर करत नाहीना? असाही केलाच पाहिजे व निसर्गाकडून मिळणाऱ्या हवा, पाणी या पर्यावरणातील मूलभूत घटकांचे आरोग्य चांगले कसे राहील यासाठी आपले योगदान काय असू शकेल याचाही विचार करणे गरजेचे आहे.
उद्योजकताही तुम्हाला सिद्धता करायला शिकवते आणि कोणत्याही गोष्टीची सिद्धता ही विविध संसाधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. आपल्या परिसरात असणाऱ्या विविध नैसर्गिक संसाधनांमुळे जर का आपल्या उद्योजकीय गरजांची पूर्ती होत असेल तर एक उद्योजक म्हणून याबाबत आपण कृतज्ञ असणे अत्यंत गरजेचे आहे. कृतज्ञता हा एक चांगला गुण असून, उद्योजकांनी या गुणाचा स्वीकार लवकरात लवकर करायलाच हवा. निसर्गासाठी, पर्यावरणासाठी आपले योगदान देऊन आपले उद्यमी आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतात. जर पर्यावरण आपल्याला व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध गोष्टी देत असेल तर आपण उद्योजक म्हणून आपल्या पुढच्या पिढीसाठी हे पर्यावरण वाचवण्यासाठी आपला वेळ, अनुभव, पैसा, ऊर्जा देऊन कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तसेच आपण एक व्यक्ती म्हणून किंवा एक उद्योजक म्हणून किती कार्बन या वातावरणात उत्सर्जित करतो, याची नोंद ठेवली पाहिजे.
स्वयंपाक करणे, प्रवास करणे विविध उपकरणे वापरणे अशा आपल्या दैनंदिन कामांमधून प्रत्येक कुटुंबाकडून किंवा विविध औद्योगिक प्रक्रियांमधून उद्योगांमार्फत कार्बनडाय ऑक्साइड वातावरणात मिसळत असतो. प्रत्येक माणूस दिवसाला किंवा वर्षाला किती कार्बन डायऑक्साइड वातावरणात मिसळवतो, यालाच कार्बन फुटप्रिंट म्हणतात. येणाऱ्या काळात आपल्याला या शब्दांचे अर्थ उद्योजक म्हणून विशेषत्वाने लक्षात घ्यायला लागणार आहेत. स्वत:च्या पर्यावरणस्नेही उद्योगातून किंवा कृतीतून येणाऱ्या पिढीसाठी कोकणातल्या उद्योजकांना वेगळी फुटप्रिंट तयार करायची असेल तर त्यांना कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? त्याची परिभाषा काय? हे समजून घ्यावेच लागेल तसेच त्यावर तातडीने उपाययोजना अंमलात आणावी लागेल. कार्बनची काही वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे वेगवेगळी वस्तुमाने असलेले कार्बनचे अणू आहेत. दुसरे म्हणजे कार्बनची संरूपे ही आहेत आणि तिसरे म्हणजे इतर मूलद्रव्यांशी मैत्री करायला कार्बनला खूप आवडते. त्यामुळे विविध संयुगे तयार होतात. या संयुगांचा अभ्यास करणारी कार्बन रसायनशास्त्र अशी एक स्वतंत्र शाखा रसायनशास्त्रात आहे, अशी शाखा फक्त कार्बन याच मूलद्रव्यासाठी आहे. त्याच्या ऑक्सिजनशी असलेल्या मैत्रीमुळे कार्बन डायऑक्साइड हा वायू तयार होतो. वातावरणातील हा कार्बन डायऑक्साइड वायू वनस्पती शोषून घेतात. सूर्याच्या प्रकाशरूपी ऊर्जेच्या मदतीने वनस्पती या कार्बन डायऑक्साइडमधील कार्बन ग्लुकोज, फ्रुक्टोन तयार करायला वापरतात आणि ऑक्सिजन सोडून देतात. शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांपर्यंत कार्बन पोहचतो. हे प्राणी जेव्हा मरतात तेव्हा त्यांच्या कुजण्याच्या क्रियेतून कार्बन डायऑक्साइड पुन्हा वातावरणात सोडला जातो. अशाप्रकारे चक्र चालूच राहते यालाच कार्बनचक्र असे म्हणतात. कार्बन हा पृथ्वीवरील जीवाचा मुलाधार आहे. पृथ्वीवर रासायनिक स्वरूपात आढळणारा कार्बन सतत जीवमंडल मृदा मंडल, भूमंडल, जलमंडल, वायूमंडल अशा विविध मंडलात विविध स्वरूपात फिरत असतो, यालाच आपण कार्बनचक्र असे संबोधतो.
उद्योजक पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकतात!
* जीवाश्म इंधनाचा वापर कमी प्रमाणात करणे.
* हरितऊर्जेला प्रोत्साहन देणे.
* घातक रासायनिक पदार्थांचे योग्य व्यवस्थापन करणे.
* प्रदूषित जलस्रोत साफ करणे किंवा आपल्यामुळे आपल्या परिसरातील जलस्रोत प्रदूषित होणार नाहीत ना याची खबरदारी घेणे.
* झाडे लावणे आणि जंगलतोड कमी करणे या संबंधी पुढाकार घेऊन जनजागृती करणाऱ्या संस्थांबरोबर काम करून आपल्या स्थानिक परिसरात वृक्षारोपण करणे.
* आपल्या कर्मचाऱ्यांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करणे व त्यांना आवश्यक ती झाडे उपलब्ध करून देणे.
* पर्यावरणरक्षणाची जबाबदारी ओळखून आपल्या आस्थापनेची त्या संदर्भातील गुणात्मक ध्येयधोरणे ठरवणे.
* नकारात्मक प्रभाव कमी करून पर्यावरण रक्षण व संवर्धन यासाठी आपल्या आस्थापनेअंतर्गत एका कृतिदलाची नियुक्ती करणे.
* अक्षय ऊर्जा वापर वाढवण्यावर भर देणे.
* प्रदूषण नियामक मंडळ व शासनाच्या सर्व पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे.
* आपल्यामुळे प्रदूषण होत असेल तर ते मान्य करून प्रदुषणाची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणणे.
* पर्यावरणीय चेतना आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वृद्धिंगत करण्यासाठी कामाच्या ठिकाणी तशी कार्यसंस्कृती विकसित करून पर्यावरणीय गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करणे.
* शक्य असल्यास सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देणे.
* आपल्या कामगारांना ऊर्जाबचतीचे महत्व पटवून देणे.
* कारखान्याच्या आवारातील पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न करणे.
* उद्योजकांनी पर्यावरण साखळी व अन्नसाखळी समजून घेणे गरजेचे.
* वाढते तापमान ही गंभीर समस्या उद्योजकांनी लक्षात घेऊन येणाऱ्या काळात वनसंवर्धन व वनउपज प्रक्रिया

उद्योगांसंदर्भात निश्चित धोरण तयार करणे आवश्यक...

पर्यटन, अन्नप्रक्रिया उद्योग, सौरऊर्जा, पवनऊर्जा यावर आधारित उद्योग, फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, पर्यावरणपूरक व पर्यावरणस्नेही उद्योग भावी काळात कोकणात मोठ्या प्रमाणात तयार व्हावेत व ग्रामीण भागात पर्यावरणस्नेही उद्योजकांची संख्या वाढावी व अमूल्य असे हे निसर्गचक्र अविरतपणे चालू राहावे म्हणून या पर्यावरणदिनी ‘पर्यावरण व उद्योजकता यांचा परस्पर संबंध’ या विषयी लोक जागर होणे गरजेचे आहे. अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा योग्य वापर आपल्या उद्योजकांनी करायला सुरवात करून खऱ्या अर्थाने पर्यावरण सजगता दाखवून द्यायला हवी.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.