Harnai Khem Dam : १८ तास उलटूनही हर्णै खेम धरणात बुडालेल्या मुलाचा अजूनही लागला नाही शोध

काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हर्णै खेम धरणामध्ये ही घटना घडली.
Harnai Khem Dam
Harnai Khem Damesakal
Updated on

हर्णै : आज ता.८ सायंकाळी ४ वाजेपर्यंत १८ तास उलटून सुद्धा हर्णै खेम धरणात बुडालेल्या मुलाचा अजूनही शोध लागला नव्हता. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रयत्न सुरू असल्याचे दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी सांगितले.

Harnai Khem Dam
Nashik Crime News : निवाणे ग्रामपंचायतीमधील अपहारप्रकरणी माजी सरपंचासह दोघांना पोलिस कोठडी

काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हर्णै खेम धरणामध्ये ही घटना घडली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तन्मय संतोष पड्याल, तुषार संतोष पड्याल, सोयल सौजन्य थोरे आणि कल्पेश रुपेश बटावळे हे सर्व आंजर्ले गावापासून जवळपास असलेल्या सातांबा गावातीलच आहेत. हे चौघेही हर्णै धरणात पोहायला आले होते. हर्णे ग्रामपंचायतीने अलीकडच्या बाजूस पोहोण्यासाठी एक स्विमिंग तलावासारखा तलाव सर्वांना पोहायला बांधला असताना बहुतांशी तरुण मंडळी या मुख्य खोल धरणात पोहायला जातात. त्याप्रमाणे हे चौघेजण त्या मुख्य धरणात पोहायला गेले. येथील सुरक्षारक्षक त्यांना त्या मुख्य धरणात जाण्यास अटकाव करत असताना त्यांचे न ऐकता हे चौघेही तिथे पोहायला गेले. आणि अनर्थ घडला. एकंदर धरणाच्या खोलाईचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडला. दोघेजण बुडू लागले तेथील उपस्थित काही तरुणांनी एकाला वाचवले परंतु कल्पेशला वाचवायला त्यांना जमले नाही त्याचवेळी याठिकाणी कल्पेश बुडाला.

Harnai Khem Dam
Nashik Crime News : निवाणे ग्रामपंचायतीमधील अपहारप्रकरणी माजी सरपंचासह दोघांना पोलिस कोठडी

कल्पेश हा रुपेश बटावळे यांचा एकुलता एक मुलगा होता. व एक मुलगी आहे. ती सध्या सहावी इयत्तेत शिकत आहे. रुपेश बटावळे हे त्यांच्या फॅमिलीसह कामानिमित्त मुंबई दहिसर येथे रहातात. त्यांचे गावी देखील घर आहे. कल्पेश दोन दिवसांपूर्वी एकटाच गावी आला होता. त्याचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते. नुकताच तो दहिसर येथे पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीला देखील लागला होता. वडील रुपेश बटावळे हे मुंबईमध्ये डायमंडच्या कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. काल रात्रीच कल्पेश मुंबईमध्ये निघून जाणार होता. परंतु तो काल सायंकाळी हर्णे येथे धरणात पोहायला आला आणि कायमचाच हे जग सोडून गेला असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. घटना घडल्यावर तातडीने कल्पेशच्या आई वडिलांना मुंबईतुन बोलावण्यात आले. ते आज सकाळी गावी हजर झाले आहेत. हातातोंडाशी आलेला मुलगा अश्या घटनेने जग सोडून निघून गेल्यामुळे बटावळे परिवारावर मोठा डोंगर कोसळला आहे.

काल सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा साधारण २ वाजेपर्यंत पोलीस व अन्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सातांब्यातील ग्रामस्थ शोध घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु काहीही हातास लागले नाही. कारण रात्रीची वेळ होती तसेच पाऊसही प्रचंड पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शोधकार्य लवकर करणार असल्याचे दापोली तहसीलदारांनी सांगितले होते परंतु आज ता. ८ रोजी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा साधारण ११ वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. दोन छोट्या बोटी घेऊन संपूर्ण धरणाच्या आजूबाजूच्या झाडीमधून शोध सुरू केला आहे. तसेच जर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रात्री सदरचा मृतदेह पुढे गेला असेल तर आंजर्ले खाडी किनारी देखील छोट्या होड्या तैनात करून ठेवल्या आहेत. तसेच काठावरून गळाच्या साहाय्याने साधारण खोलईच्या अंदाजाने तेवढा मोठा दोर टाकून गळाला काही लागतंय का ते ही बघायचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून गळाला काही लागलेच तर तशी यंत्रणा पाचारण करून सदरचा मृतदेह बाहेर काढायला यश येईल असे दापोली तहसीलदार श्रीम. बोंबे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.