'विमानतळाचे खरे श्रेय नारायण राणेंचेच'

आज जागा संपादन नसती तर विरोधकांनी नाणार, सीवर्ल्ड प्रकल्पासाठी लावलेले विरोधाचे तुणतुणे विमानतळाच्या जागेसाठीही लावले असते.
'विमानतळाचे खरे श्रेय नारायण राणेंचेच'
Updated on
Summary

आज जागा संपादन नसती तर विरोधकांनी नाणार, सीवर्ल्ड प्रकल्पासाठी लावलेले विरोधाचे तुणतुणे विमानतळाच्या जागेसाठीही लावले असते.

देवगड : विकासकामे पूर्णत्वास जावून त्याचे लोकार्पण तेव्हाच होते जेव्हा त्यासाठी आवश्यक असलेली जागा आधी संपादित करावी लागते. चिपी विमानतळाच्या लोकापर्णाचे श्रेय शिवसेनेने जरूर घ्यावे; मात्र त्यासाठी आवश्यक जागा संपादित करण्याचे खरे श्रेय भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जाते, अशी स्पष्टोक्ती भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली. त्यामुळे हिंमत असल्यास खासदार विनायक राऊत यांनी सीवर्ल्ड प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा मिळवून दाखवावी, असे आव्हानही जठार यांनी दिले.

जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयात जठार माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, पंचायत समिती सदस्य अमोल तेली, उत्तम बिर्जे, भूषण बोडस आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, ‘‘पुरेशा जागेअभावी कोणताच विकासात्मक प्रकल्प पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे लोकापर्णापेक्षा खरी गरज जागा संपादन करण्याची असते. त्यामुळे केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी तत्कालीन स्थितीत जागा संपादन करून ठेवली नसती तर विमानतळ लोकार्पण सोहळा झालाच नसता. त्यामुळे प्रकल्पाचे खरे श्रेय जागा संपादनाला जाते.

'विमानतळाचे खरे श्रेय नारायण राणेंचेच'
केवळ मोदींची खुर्ची लिलावात काढणे बाकी - मेधा पाटकर

आज जागा संपादन नसती तर विरोधकांनी नाणार, सीवर्ल्ड प्रकल्पासाठी लावलेले विरोधाचे तुणतुणे विमानतळाच्या जागेसाठीही लावले असते. त्यामुळे आता लोकापर्णाचे श्रेय घेण्यासाठी धावलेल्या मंडळींनी त्यावेळीही भूसंपादनाला विरोध केला असता हे वास्तव आहे. त्यामुळे खासदार राऊत यांना कोकण विकासाची एवढीच तळमळ असल्यास त्यांनी सीवर्ल्ड, नाणार प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करावेत.’’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादनासाठी पाचपट मोबदला रक्कम दिल्यानेच भूसंपादन वेगाने होऊन मुंबई -गोवा महामार्ग झाला. त्यामुळे त्याचे खरे श्रेय गडकरी यांना जाते. तसेच विमानतळासाठी जागा उपलब्ध करण्याचे श्रेय राणे यांचेच आहे.

खासदारांकडून विकासकामांत अडसर

विकास कामांमध्ये आडवे पडण्याची खासदार राऊत यांची जुनी सवय आहे. विमानतळ उद्‍घाटन पत्रिकेत नारायण राणे यांचे नाव छोट्या अक्षरात छापणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित न करणे अशा कोत्या मनोवृत्तीचे खासदार आहेत, अशी टीका जठार यांनी यावेळी केली.

'विमानतळाचे खरे श्रेय नारायण राणेंचेच'
काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; सुरक्षादलाला यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()