Konkan Accident: ब्लू जेट आग दुर्घटनेतील ११ पैकी ८ मृतदेह सापडले

explosion in Blue Jet Healthcare Limited company in Mahad MIDC Many workers feared to be trapped
explosion in Blue Jet Healthcare Limited company in Mahad MIDC Many workers feared to be trapped
Updated on

Election News: महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘ब्ल्यू जेट हेल्थकेअर’ या कंपनीत शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीमध्ये सात कामगार जखमी, तर अकरा बेपत्ता झाले होते. या बेपत्ता कामगारांचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून (एन.डी.आर.एफ) रात्रभर शोधकार्य सुरू होते.

दरम्यान, आज सकाळपर्यंत एकूण आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून हे मृतदेह पूर्णपणे जळालेल्या स्थितीत असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. त्यामुळे डीएनए चाचणी करण्यासाठी मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले असून इतरांचा अद्यापही शोध सुरू आहे.

‘ब्ल्यू जेट’ या कंपनीमधील रिअॅक्टरचा स्फोट झाल्याने शुक्रवारी सात कामगार जखमी, तर अकरा कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी मध्यरात्री कामगारांच्या नातेवाईकांसह, ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. शनिवारी सकाळी एनडीआरएफच्या हाती ११ जणांपैकी आठ जणांचे मृतदेह लागले.

यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉक्टर डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाड प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे, तहसीलदार महेश शितोळे, कारखाना सुरक्षा विभाग अधिकारी काटमवर या सर्व अधिकाऱ्यांनी मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करत मृतदेहांची ओळख पटविण्याकामी मृतदेहाची जनुकीय चाचणी (डीएनए टेस्ट) करून संबंधित मृतदेह वारसदारांच्या ताब्यात देण्यात येतील असे सांगितले. दरम्यान, कंपनीकडून मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी तीस लाख रुपये, तर मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये व प्रत्येकी मिळणारी विम्याची रक्कम अशी एकत्रित आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे यावेळी गोगावले यांनी सांगितले. सोबतच या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.

दोषींवर कठोर कारवाई करणार : उदय सामंत

‘ब्ल्यू जेट’ कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, त्याचबरोबर कंपनीतील स्फोटाने दुर्घटनाग्रस्त झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाड औद्योगिक क्षेत्रातील ‘ब्ल्यू जेट हेल्थकेअर’ या कंपनीतील स्फोटाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी मध्यरात्री घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी अपघातस्थळी कंपनी प्रशासनाकडून तसेच सरकारी यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या मदत कार्याचा सामंत यांनी आढावा घेतला. या अपघाताची योग्य ती चौकशी केली जाणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे यावेळी उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

आदित्यचा निर्णय चुकला, शिफ्ट बदलली आणि... ‘ब्ल्यू जेट हेल्थकेअर’ या कंपनीतील भीषण स्फोटात दगावलेला आदित्य मोरे याने ३ नोव्हेंबरला असलेली आपली सेकंड शिफ्ट बदलून फर्स्ट शिफ्ट मागून घेतली. शिफ्ट बदलणे ही त्याची मोठी चूक ठरली. तीन महिन्यांपूर्वी कामाला लागलेल्या आदित्य मोरेचे एमएस्सी (विज्ञान शाखेची पदवीत्तर पदवी) होण्याचे स्वप्नदेखील अपूर्ण राहिले आहे. महाड शहराजवळ असणाऱ्या चोचिंदे गावातील आदित्य हा नुकताच बीएस्सी पास झाला. त्याचे वडील एका औषध दुकानात कामाला आहेत. आपले काम सांभाळत एमएस्सी पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न होते. शुक्रवारी कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये ११ कामगारांचा मृत्यू झाला. यामध्ये आदित्यचादेखील समावेश आहे. आदित्यच्या मृत्यूमुळे चोचिंदे गावामध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.