कोरोनाला फाईट देण्यासाठी मंत्रीमंडळाची फिल्डिंग टाईट; राज्यातून विषाणू होणार हद्दपार?

कोरोनाला फाईट देण्यासाठी मंत्रीमंडळाची फिल्डिंग टाईट; राज्यातून विषाणू होणार हद्दपार?
Updated on

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोरोना व्हायरच्या (Covid Virus)दुसऱ्या लाटेने जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या (Healthcare) मर्यादा उघड झाल्या आहेत. आता भविष्याचा विचार करून जिल्हा रुग्णालयापासून गावातील आरोग्य उपकेंद्रपर्यंतची आरोग्यसेवा बळकट करण्याची 'हीच योग्य वेळ' आली आहे. जिल्ह्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून सक्षमपणे शासकीय आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी सर्वांना प्रामाणिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

Exposing the limitations of healthcare Honest effort is needed kokan marathi news

जिल्ह्यात आजवर वेगवेगळ्या साथ रोगाच्या संकटाने आरोग्य सेवेच्या मर्यादा उघड केल्या आहेत. यापूर्वी कणकवली परिसरातील लॅप्टोपारोसिस, मालवण तालुक्‍यातील हत्ती रोग, दोडामार्गातील माकड ताप अशा विविध जीवघेण्या या रोगाने सिंधुदुर्गाचील जनता नेहमीच होरपळली आहे. राज्य, केंद्र आणि राज्य शासनाने आरोग्य सेवेकडे कमालीचा दुर्लक्ष केल्याचे चित्र अशा साथ रोगातून पुढे आले आहे. शासकीय आरोग्य सेवेच्या तुलनेत खाजगी आरोग्यसेवा मात्र, कमालीची बळकट होऊ लागली आहे. खाजगी आरोग्य सेवेकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे. किंबहुना ग्रामीण भागापर्यंत लहान मोठी रुग्णालये उभारली जात आहेत.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील आरोग्य यंत्रणेने इतर देशांकडे भीक मागायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात कोरोना व्हायरसच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कोट्यावधी होऊ खर्च केले गेले. जनतेच्या आरोग्यासाठी हा पैसा खर्च करणे अनिवार्य होते; मात्र राजकीय आरोप-प्रत्यारोपात आरोग्याच्या सेवेकडे झालेले दुर्लक्ष अधोरेखित होऊ लागले आहेत. त्यातच अशा साथ रोगातून भ्रष्टाचार करणाऱ्या एका प्रवृत्तीला ही चांगलेच पाय फुटले आहेत. त्यामुळे शहरापासून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा पूर्णतः डबघाईस आली आहे.

दुसऱ्या लाटे नंतर औषधांचा तुटवडा, रुग्णांची होणारी हेळसांड हे चित्र माध्यमांमधून दररोज पाहायला मिळते. आता या आरोग्य सेवेला बळकटी आणण्यासाठी शासकीय पातळीवरील राज्यकर्ते आणि प्रशासनाला संधी आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम झाली तर शहरी भागावर फार मोठा ताण येणार येणार नाही. त्यामुळे शासन स्तरावरील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, गावातील उपकेंद्रे सक्षम करण्याची 'हीच ती योग्य वेळ' असल्याची भावना जनमानसात आहे.

राज्यकर्ते काय म्हणतात?

पालकमंत्री उदय सामंत

जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे गेले वर्ष-दीड वर्ष जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सातत्याने पाठपुरावा करत आरोग्य सेवा बळकटीसाठीचा प्रयत्न प्रामाणिक सुरू आहे; मात्र खऱ्या अर्थाने पालकमंत्री या नात्याने उदय सामंत यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 'आरोग्याचा रोड मॅप' भविष्यासाठी तयार करावा लागणार आहे.

कोकणचे अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार विनायक राऊत

महिला रुग्णालय, मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्नशील असणारे खासदार विनायक राऊत यांनीही गेल्या वर्ष भरात आपली ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मानले गेलेले खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मंजूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. कुडाळ येथील महिला रुग्णालय उभारण्यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता; मात्र भविष्यातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी आता धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.

आमदार वैभव नाईक

रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेले आमदार वैभव नाईक यांनीही गेल्या दोन वर्षांमध्ये आपली राजकीय ताकद पणाला लावून विविध भागात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज, महिला रुग्णालय किंवा अन्य आरोग्याच्या सेवेसाठी वैभव नाईक यांनी सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. ग्रामीण भागातील जनतेला काय हवे आहे. याची पूर्ण जाण त्यांना आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्याची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा पुरवण्यासाठी वैभव नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

आमदार नितेश राणे

गरजूंसाठी पुढे हात करणारे आणि आरोग्य सेवेला सक्षम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे आमदार नितेश राणे यांनी गेल्या वर्षभरामध्ये सर्वतोपरी प्रयत्न सुरू केल्या आहे. मोफत औषध पुरवठा असो, घरपोच आरोग्य सेवा देणे, रुग्णवाहिकेचा पुरवठा, ऑक्‍सिजन किंवा इंजेक्‍शन पुरवठा अशा विविध बाबींसाठी आमदार नितेश राणे यांनी प्रमाणिक प्रयत्न केले आहेत. आपल्या मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आरोग्य सेवेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू त्यांनी आपल्या माध्यमातून पुरवठा केला आहे. तसेच जिल्ह्यासाठी आपल्या कुंटुंबाच्यामाध्यमातून लाईफ टाईम रूग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारून आरोग्यसेवेच्या या सक्षमीकरणात मोठा हातभार लावला आहे.

Exposing the limitations of healthcare Honest effort is needed kokan marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.