Raigad News : शेतकरी कामगार पक्ष शरद पवारांच्या पाठीशी; जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक ‘मविआ’तूनच

शेकापसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक अतिमहत्त्वाची
Farmers With Sharad Pawar raigad District Central Bank election contested mahavikas aghadi
Farmers With Sharad Pawar raigad District Central Bank election contested mahavikas aghadiSakal
Updated on

Sharad Pawar NCP : राष्‍ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर स्थानिक राजकारण करणाऱ्या पक्षांचीही फरफट सुरू झाली आहे. यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण शरद पवार यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली आहे.

Farmers With Sharad Pawar raigad District Central Bank election contested mahavikas aghadi
Farmer : शेतकऱ्यांना दिलासा! तुरीला १२ हजारांवर भाव; आणखी दर वधारण्याचे संकेत

शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून शरद पवार आमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून दूर होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे जयंत पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या खंबीर भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. एकेकाळी राज्यात प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे क्षेत्र कमी होत रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येच राहिले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसारखी काही बलस्थाने ताब्यात ठेवत त्यांच्या आधारावर शेकाप जिल्ह्यात जिवंत आहे. त्यामुळे शेकापसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक अतिमहत्त्वाची आहे.

परंतु सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये राष्ट्रवादीसारख्या महत्त्वाच्या पक्षातच फूट पडल्याने यावर अवलंबून स्थानिक राजकारण करणारेही पक्ष सावध भूमिका घेऊ लागले आहेत. याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपसारख्या धर्मांध पक्षाबरोबर शेकाप कधीही संधान बांधणार नाही, अशी ताठर भूमिका घेत शेकाप शरद पवार यांच्याबरोबरच कायम राहील, असे सांगितले.

Farmers With Sharad Pawar raigad District Central Bank election contested mahavikas aghadi
Raigad: बंडानंतर चित्र पालटले ! सुनील तटकरे विरूद्ध भास्कर जाधव पुन्हा रंगणार सामना

लवकरच शरद पवार रायगडमध्ये येणार आहेत. तेव्हा रायगडमधील महाविकास आघाडीची ताकद सर्वांना दिसून येईल.

आमदार जयंत पाटील यांचे वक्तव्य सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे. तीस वर्षांपासून केवळ शेकापच्या मतांवर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक एकहाती ताब्यात ठेवणारे पाटील पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या मदतीने निवडणूक लढवत असून यासाठी १५ जुलै रोजी मतदान आहे.

Farmers With Sharad Pawar raigad District Central Bank election contested mahavikas aghadi
Sharad Pawar : एक डाव राखून ठेवणारा वस्ताद! काकांना चीतपट करण्याचे पुतण्यासमोर खडतर आव्हान

रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात प्रबळ आहे. जिल्ह्यात खासदार सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादीची सर्व सूत्रे एकवटली असताना, अशा परिस्थितीत तटकरे हेच अजित पवार गटात सहभागी झाल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद कमी झाली.

अचानक निर्माण झालेल्या या राजकीय परिस्थितीचा परिणाम शेतकरी कामगार पक्षाला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आरडीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

२०१९ च्या निवडणुकानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाली, यात शेकापसारख्या प्रादेशिक पक्षांचाही सहभाग होता. महाविकास आघाडीचे नेत शरद पवार असून त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढत आहोत.

राहिला प्रश्न जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत आम्हाला काहीही फटका बसणार नाही. या निवडणुकीची तयारी तीन वर्षांपूर्वीच करण्यात आली आहे. आता फक्त औपचारिकता उरली असून २१ पैकी १८ उमेदवार बिनविरोध निवडून येतील. उर्वरित उमेदवारही आमचेच असतील.

- आमदार जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.