कोकणात आगीचं तांडव सुरुच; आंबा, काजूच्या बागा खाक, शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

fire in farming of cashew and mango achra sindhudurg damage farm
fire in farming of cashew and mango achra sindhudurg damage farm
Updated on

आचरा (सिंधुदुर्ग) : चिंदर-सडेवाडी येथील माळरानावर आज दुपारी लागलेल्या आगीने आंबा, काजू कलम बागा भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.स्थानिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला यामुळे काही बागा वाचवण्यात यश आले. 

आज दुपारच्या सुमारास चिंदर माळरानावर अचानकपणे आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आणि वाढलेल्या सुक्‍या गवतामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. यात आंबा, काजू, माडबागायती जळून खाक झाल्या आहेत. चिंदर येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी जीव धोक्‍यात घालून मिळेल त्याने आग विझवत आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. बाबू हडकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, मनोज हडकर, देवेंद्र हडकर, तलाठी व्ही. व्ही. कंठाळे, जितू पांगे, राजू गावकर आदींनी मदतकार्य केले. मिलिंद पाटील, प्रदीप वायंगणकर, निलेश परब, धनंजय आचरेकर, राजा कांबळी यांनी ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविले. पावसकर, विनोद चौबे, तिरोडकर, प्रकाश हडकर आदी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.