कोकण : पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

fire in kankavli market in today morning three shop fires in sindhudurg
fire in kankavli market in today morning three shop fires in sindhudurg
Updated on

कणकवली (सिंधुदुर्ग) : येथील बाजारपेठेत आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. विजेच्या शॉर्टसक्रिटमुळे आज लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. जिल्हाभरातून आलेल्या अग्निशामक बंबानी आगीवर वेळीच नियंत्रण आले. त्यामुळे बाजारपेठेतील इतर दुकाने आणि घरे वाचविण्यात यश आहे.

शहरातील झेंडा चौकतील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊस, रामचंद्र उचले किराणा दुकान पुर्ण जळाले. अंधारी ब्रदर्स यांचे दुकान व राहत्या घराला ही आगीची झळ बसली. या आगातील लाखोरूपयांचे नुकसान झाले आहे. कणकवलीचे नागरिक पहाटेच्या झोपेत असताना बाजारपेठेत अचानक आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केले. उचले यांचे दुकान सुमारे 70 वर्षांपुवीचे होते. त्यामुळे जुन्या काळातील त्यांचे दुकान पुर्ण लाकडी कौलारू होते. परिणामी आगीन पेट घेतला. आगीची माहाती मिळताच. नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. 

या आगीत जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस मधून मोठ्या प्रमाणत धुराचे व आगीचे लोट येवू लागले. या लगतच्या नागरिकांना याबाबत कल्पना आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती नगरपंचायतीला दिली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. ही आग जयभारत कोल्ड्रिंक्ससहित लगतच्या उचले किराणा दुकानापर्यंत पोहचली. तसेच लगतच्या अंधारी यांच्या दुकान व घराच्या दिशेने आगीचे लोट सुरू झाले. 

नगराध्यक्ष समीर नलावडे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने अग्नीशामक बंब बोलविला. तसेच दिलीप बिल्डकोंचा पाण्याचा टँकर मागविण्यात आला व आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. नलावडे यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, भाई साटम, प्रसाद अंधारी, अमित सापळे,नाना सापळे, प्रद्युम मुंज, बापू पारकर, हर्षल अंधारी, आदित्य सापळे, आशिष वालावलकर आदी तसेच कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी व नागरिक सहकार्य करत होते.

आगीत दुकान मालक आबा उचले, राजेंद्र बाजाजी, नाथा अंधारी यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी मालवण, सावंतवाडी येथील अग्निशामक बंब दाखल झाले. सकाळी आगीवर नियंत्रण आले. त्यानंतर आग लागलेली दुकाने जेसीबीच्या सह्याने जमीनदोस्त करण्यात आली. उशीराने पंचनामा झाल्यावर नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.