अजस्र लाटांचा तडाखा! मासेमारी करणाऱ्या नौकेला जयगड समुद्रात जलसमाधी; मच्छीमारांनी वाचविले 10 खलाशांचे प्राण

मासेमारी करणाऱ्या मिनी पर्ससिन नौकेला (Fishing Boat) अजस्र लाटांच्या तडाख्याने जलसमाधी मिळाली.
Fishing Boat
Fishing Boatesakal
Updated on
Summary

जयगड येथील मच्छीमार मिनी पर्ससिन घेऊन जयगड समुद्रात नऊ वावात मासेमारी करीत होते.

रत्नागिरी : मासेमारी करणाऱ्या मिनी पर्ससिन नौकेला (Fishing Boat) अजस्र लाटांच्या तडाख्याने जलसमाधी मिळाली. जयगड दीपगृह (Jaigad Lighthouse) येथे किनाऱ्यावरून सुमारे ९ वावामध्ये ही घटना घडली. सुदैवाने त्या बोटीवरील १० खलाशांना बाजूलाच मासेमारी करणाऱ्या अन्य मच्छीमारांनी वाचवले.

Fishing Boat
Kolhapur Politics : 'या' कारणावरून मंडलिक-मुश्रीफ गटात वाद; केसरकर म्हणाले, 'एका घरात अशी धुसफूस..'

मत्स्य विभाग उशिरापर्यंत या घटनेची माहिती घेत होता. लहरी वातावरणाचा मासेमारी हंगामावर परिणाम झाला आहे. मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणात मासेमारी होत होती. परंतु, पुन्हा पावसाळी वातावरण (Rainy Season) आहे. वादळी वारा आणि समुद्राला उधाण आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊन मच्छीमार मासेमारीसाठी जात आहेत.

Fishing Boat
Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगल कोणी घडवली, खरे मास्टरमाईंड कोण? 'या' सहा जणांची नाव घेत पावसकरांचा मोठा गौप्यस्फोट

जयगड येथील मच्छीमार मिनी पर्ससिन घेऊन जयगड समुद्रात नऊ वावात मासेमारी करीत होते. तेथून परतत असताना सलग तीन अजस्र लाटांचा तडाखा या बोटीला बसला. बोटीत पाणी भरल्याने हळूहळू बोट बुडू लागली. बोटीत १० खलाशी होते. बोट पाण्यात उलटी झाल्यानंतर अनेक खलाशीपान तरंगणाऱ्या बोटीच्या तळावर उभे होते.

जवळ मासेमारी करणाऱ्या अन्य बोट मालकांनी एक एक करत खलाशांना बोटीत घेत जीवदान दिले. नंतर सर्वांसमोर या मच्छीमारी बोटीला जलसमाधी मिळाली. साई गणेश असे बुडालेल्या मासेमारी नौकेचे नाव आहे. जयगड येथील संतोष हळदणकर यांच्या मालकीची ही मासेमारी नौका असल्याची माहिती मच्छिमारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मत्स्य विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांमार्फत उशिरा याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

Fishing Boat
उसाचा 400 रुपये हप्ता 17 दिवसांत न दिल्यास 2 ऑक्टोबरला प्रत्येक कारखान्यावर ढोल वाजवणार; राजू शेट्टींचा स्पष्ट इशारा

बेकायदेशीर मासेमारी

मिनी पर्ससिन नौकांमार्फत बेकायदेशीर मासेमारी केली जात असल्याची चर्चा होती. या विनापरवानामासेमारीबाबत पारंपरिक मच्छीमार संघांनी शासनाला निवेदन दिली आहे. आज मिनी पर्ससिन नौका बुडाल्यानंतर किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ही बेकायदेशीर मासेमारी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मत्स्य विभाग काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.