कोट्यवधी खर्च केलेल्या कोकणातील पाच जलप्रकल्पांना गळती

मंडणगड तालुक्यातील वास्तव; ४० वर्षांत डागडुजीवरच खर्च
कोट्यवधी खर्च केलेल्या कोकणातील पाच जलप्रकल्पांना गळती
Updated on

मंडणगड : तालुक्यात शासनाने कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या सहा मध्यम व लघु आकाराच्या जलप्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांना गळती लागली आहे. चाळीस वर्षांचा कालावधी लोटला असून गळती, कालव्यांच्या अर्धवट कामांमुळे धरणांचा मूळ उद्देशच साध्य झालेला नाही. या परिस्थितीला शासन, प्रशासनाची उदासीन मानसिकतेसोबत स्थानिकांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. परिणामी धरणामुळे होणारी कृषी संपदा कधीही तालुक्यात दिसलीच नाही. पावसात ओव्हरफ्लो होणारे हे जलप्रकल्प फक्त डोळ्यांना सुखावणारे ठरत असून निधी खर्च करण्याचे माध्यम ठरत आहेत.

तालुक्याची भौगोलिक रचना डोंगराळ, दरीखोऱ्यांची. वर्षानुवर्षे शेतकरी भात, नाचणी पिकांपुरता मर्यादित राहिला. दरवर्षी सरासरी सुमारे ३५०० हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडूनही येथील जलसिंचन वाढले नाही. याला अपूर्णावस्थेतील जलप्रकल्प कारणीभूत ठरले आहेत. १९७९ ला चिंचाळी हे पहिले धरण बांधण्याची सुरवात झाली. तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. गळती लागल्याने चिंचाळी व तुळशी धरण धोकादायक असल्याचे जलसंधारण विभागाने तिवरे दुर्घटनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये घोषित केले आहे. चिंचाली धरणाचा सांडवा व भिंत पुन्हा काढून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे तर तुळशीला दुरुस्तीची अजूनही प्रतीक्षा आहे.

कोट्यवधी खर्च केलेल्या कोकणातील पाच जलप्रकल्पांना गळती
रस्त्यावर पाणीच पाणी; रत्नागिरीतील शिवाजीनगरात फुटला पाईप

भोळवली धरणाच्या गळतीमुळे भारजा नदीला बारमाही पाणी वाहते आहे. त्या पाण्यावर कलिंगड व भाजीपाला शेती करण्यात येते, हीच एक आश्वासक बाब आहे. वेळास येथील व्याघ्रेश्वर प्रकल्पाची तीच अवस्था असून आता यात या पावसाळ्यात गळती लागल्याने पणदेरी धरणाची भर पडली आहे. तिडे धरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

धरणांमुळे तालुक्यातील १३४६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येण्याची अपेक्षा होती. परंतु एक हेक्टरही जमीन ओलिताखाली आलेली नसल्याचे वास्तव आहे. हे स्थापत्यशास्त्रातील तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे की यंत्रणेला लागलेल्या गळतीमुळे याची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. उपयोगापेक्षा डागडुजीवर अधिक खर्च करण्यात आला आहे. धरणातून वर्षानुवर्षांचा गाळ भरला असून अर्धवट अवस्थेतील कालवे बुजायला लागले आहेत. धरणग्रस्त गावांच्या विहिरींची पाणीपातळी वाढविण्याव्यतिरिक्त त्यांचा मूळ उद्देशच साध्य न झाल्याने हे जलप्रकल्प फक्त निधी खर्च करण्याची माध्यम ठरत आहेत.

कोट्यवधी खर्च केलेल्या कोकणातील पाच जलप्रकल्पांना गळती
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी

तालुक्यातील धरणे ही गळती आणि उपयोग शून्यतेमुळे परिसरातील गावांवर वॉटर बॉम्ब बनली आहेत. धरणातून प्रचंड पाणीसाठा असतानाही अपूर्णावस्थेतील कालव्यांचा प्रश्न गंभीर आहे. प्रकल्प पूर्ण झाल्याचे फलक लावले. मात्र, कालव्याचा ठिकाणा नाही. यावर काम होताना दिसत नाही. ओलिताखालील क्षेत्र प्रत्यक्षात यायला हवे.

- कौस्तुभ जोशी, शेतकरी संघर्ष समिती मंडणगड.

ही आहेत सहा धरणे

चिंचाळी, तुळशी, पणदेरी,
भोळवली, तिडे, व्याघ्रेश्वर
दोन धोकादायक - चिंचाळी व तुळशी धरण

या प्रमुख समस्यांमध्ये अडकली

चिंचाळी, तुळशी, पणदेरी, भोळवली, तिडे, व्याघ्रेश्वर अशी मध्यम व लघु आकाराची सहा धरणे आहेत, माती धरणाच्या प्रकल्पातील ही धरणे एक तर मुख्य भिंतीत गळती किंवा कालव्यांची कामे अर्धवट या दोन प्रमुख समस्यांमध्ये अडकली आहेत.

कोट्यवधी खर्च केलेल्या कोकणातील पाच जलप्रकल्पांना गळती
रत्नागिरीत रुद्रानुष्ठानाची शतकोत्तर परंपरा

एक नजर..

- दरवर्षी ३५०० हजार मि.मी. पेक्षा अधिक पाऊस
- जलसिंचनात वाढ नाही; अपूर्ण प्रकल्प कारणीभूत
- १३४६ हेक्टर ओलिताखाली येण्याची अपेक्षा फोल
- एक हेक्टरही जमीन ओलिताखाली नाही आली
- धरणातून वर्षानुवर्षांचा गाळ भरलेल्या स्थितीत
- अर्धवट अवस्थेतील कालवे लागले बुजायला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.