रत्नागिरी : बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या शिरोडा (जि. सिंधुदुर्ग) येथील तिघांच्या वन विभागाने मुस्क्या आवळल्या.काल (ता. २०) रात्री साडे नऊ वाजता मुंबई गोवा महामार्गावरील कोदवली (ता. राजापूर) येथील पेट्रोल पंपावर ही कारवाई करण्यात आली.त्यांच्याकडुन बिबट्याचे कातडे, मोबाईल, वाहन जप्त करण्यात आले आहे. राजापूर न्यायालयात त्यांना हजर केले असता ४ दिवसाची वनकोठडी सुनावली.
जयेश बाबी परब (वय -२३) , दर्शन दयानंद गडेकर (वय -२०) आणि दत्तप्रसाद राजेंद्र नाईक (वय २२, सर्व रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि.सिंधुदुर्ग ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. वन विभागाला या तस्करी बाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाची गस्त सुरूहोती. काल रात्री मुंबई गोवा महामार्गावरील कोदवली (ता. राजापूर) येथील मंगल एजन्सीचे इंडियन ऑइल या पेट्रोल पंपावर दोन दुकान धारकांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी व स्टाफ यांनी सदर ठिकाणी जाऊन संशयितांची चौकशी केली.
त्यांच्या कडील बॅगांची तपासणी केली असता एका बॅगेमध्ये बिबट्या या वन्य प्राण्याची कातडी आढळून आली. वन्य प्राण्याच्या तस्करी बाबतसंशयित आरोपी यांना वन विभागाने ताब्यात घेतले. आरोपीकडून बिबट्या (Panthera pardus) या प्राण्याची कातडी जप्त करण्यात आली.
संशयितांना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१,५२ चा भंग केलेला आहे. वरील सर्व आरोपींच्याविरुद्ध वन्यजीव(संरक्षण) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. इतर मुद्देमाल दोन मोटरसायकल (गाडी नं- एमएच- ०७ एएम ३२९४, एमएच०७- वाय १३४९ ) जप्त करुन ताब्यात घेतले. तसेच मोबाईल आरोपीकडून जप्त करुन ताब्यात घेतले आहेत. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून राजापूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले.
सरकारी वकील ओमकार गांगण यांनी सरकारची (वनविभागाची) बाजू योग्य रित्या न्यायालयासमोर मांडल्याने न्यायालयाने संशयितांना २४तारखेपर्यंत ४ दिवसांची वन कोठडी दिली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये बिबट (Leopard) हा वन्यप्राणी अनुसूची १मध्ये येतो. त्याची शिकारकेल्यास ३ ते ७ वर्षापर्यंत कारावास किंवा २५,००० दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षेचीतरतुद आहे. ही कारवाई मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, सहा. वनसंरक्षक सचिननिलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल राजापूर, स.व.घाटगे, दि.वि.आरेकर, तौ.र.मुल्ला, वनरक्षकराजापूर सागर गोसावी, वनरक्षक कोर्ले सागर पताडे, वनरक्षक साखरपा न्हा.नु.गावडे, संजय रणधिर, राहूल गुंठे यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.