राजापूर : पश्चिम घाटाच्या विविधांगी वनसंपदेचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जंगलपरिसरामध्ये विविध दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांचे वास्तव्य राहीलेले आहे. विविध कारणास्तव जखमी होणार्या या वन्यजीवांवर तात्काळ प्राथमिक उपचार करता यावेत यादृष्टीकोनातून राजापूर तालुक्यामध्ये वनविभागातर्फे ‘वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्रा’ची उभारणी करण्यात येणार आहे.