सिंधुदुर्ग : चाळीस वर्षानंतरही शेतकरी पाण्यापासून वंचित

संजू परब ; तिलारीच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालणार
संजू परब
संजू परबsakal
Updated on

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तिलारी प्रकल्पाला चाळीस वर्ष उलटूनही बरेच शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. या विभागातील कारभार लवकरच जनतेसमोर आणण्यात येणार असून कोणतीही कल्पना न देता येत्या आठ दिवसात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालणार असल्याची माहिती भाजपा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली.

नगराध्यक्ष परब यांनी आज आपल्या दालनात पत्रकार परिषद घेत तिलारी प्रकल्पाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "दोडामार्ग तालुक्याच्या ठिकाणी 40 वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून तिलारी प्रकल्प उभारण्यात आला; मात्र आजची वस्तुस्थिती पाहता अद्यापही या धरणांच्या कालव्याचे काम सुरू आहे. गेल्या चाळीस वर्षात हे काम पूर्ण करण्यास अधिकाऱ्यांना शक्य झाले नाही. अजूनही वीस वर्ष हे काम पूर्ण होऊ शकत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

संजू परब
नवाब मलिकांवर कायदेशीर कारवाई करणार: समीर वानखेडे

कारण या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून कालवे ठिकठिकाणी कोसळणे तसेच फुटण्याचे प्रकार याचमुळे घडत आहेत. मुळात भ्रष्टाचार कसा करावा? हे या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शिकावे. आजही या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. त्यामुळेच काल-परवा बांदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यानी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला होता. जर पैसे येत नसतील किंवा आले नसतील तर तसे प्रयत्न होणे आवश्यक आहे; परंतु शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेच पाहिजे."

श्री. परब पुढे म्हणाले, "या विभागातील झालेला भ्रष्टाचार लक्षात घेता वस्तुस्थिती लोकांसमोर आणणे गरजेचे आहे आणि ती आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी आठ दिवसात जिल्हाध्यक्ष तेली यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हा कार्यकारणी मंडल अध्यक्ष, सर्व पदाधिकारी तिलारी कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारणार आहोत. त्याबाबतची कोणतीही पूर्व सूचना त्यांना देण्यात येणार नाही. जर अधिकारीच कालव्यांची लाईफ संपली असे सांगत असतील तर त्याबाबतचे पुरावे आणि माहिती त्यांनी आम्हाला सादर करावी. हे कालवे बांधताना सिमेंट काँक्रेटची भिंत उभारण्याऐवजी सिमेंट प्लास्टर करण्यात अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यामुळेच आज कालव्यांची ही परिस्थिती असून ठिकाणी पाणी लिकेज होण्याबरोबरच फुटण्याचे प्रकारही सुरू आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.