कथा त्या भावंडांची! गोठलेली माणुसकी अन् हतबल प्रशासन

 four brothers were handed over to police
four brothers were handed over to police
Updated on

गुहागर : घराबाहेर काढले तरी लॉकडाऊनमध्ये अडकल्याने इथेच रहावे लागणार होते. त्यामुळे राहाण्यासाठी आसरा शोधायचा, फीटस् येणार्‍या बहिणीवर उपचार करायचे आणि मुंबईच्या घरीही जायचं आहे, अशा तीन आघाड्यावर लढण्याची वेळ भावंडांवर आली. आधार होता पण योग्य पर्याय दिसत नव्हता. अशावेळी कॉलेजमधल्या मित्राने चिपळूणातील घराचा पर्याय उपलब्ध करून दिला. त्यामुळे चिपळूणच्या दिशेने प्रवास सुरू झाला. सती गावात राहायला मिळण्याऐवजी आणखी एक संकट उभे राहिले आणि हा प्रवास अखेर पोलिस ठाण्यात पोचला. 

आबलोली परिसरातील राहत्या घरातून बाहेर पडायला लागल्यानंतर ती भावंडे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली. तिथे मुंबईच्या डॉक्टरांनी दिलेले पत्र दाखवत आम्हाला मुंबईत पाठवा. बहिणीच्या फीटवर सात वर्ष उपचार करणारे डॉक्टर पुढील उपचार करतील असे विनवलेही. पण हतबल वैद्यकीय अधिकार्‍यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यासाठी संदर्भ पत्र हातात ठेवले. जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार करणार्‍यांची धावपळ सुरू आहे. ते पूर्णत: कोरोना रुग्णालय करण्यात आले आहे. तेथील विभाग इतरत्र हलविले आहेत आणि मेंदूंच्या विकारांवर पुढील उपचार हे मोठ्या शहरातच होऊ शकतात. हे माहिती असल्याने रत्नागिरीचा पर्याय म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे होते. मुंबईतील डॉक्टरांचे पत्र आणि बहिणीचा मेंदूंचा विकार असूनही डॉक्टर कायद्यापुढे हतबल होते. यामुळे भावंडे निराश होऊन अन्य पर्यायांकडे वळली.
चिपळूणातील मित्र मदतीला धावला. तो लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेला. घराला कुलूप, पण ते फोडा असे त्यांने सांगितले. तिन्ही भांवडे मित्राच्या सती येथील घरी पोचली. कुलूप फोडायचे कसे म्हणून त्यांनी तेथील शेजार्‍यांशी संवाद साधला. यातून आणखी एक कथानक सुरू झाले.

परक्या गावातून आलेल्या मंडळींना आसरा कसा द्यायचा. सरपंच, पोलीस पाटील, आरोग्य सेवक सर्वांनाच तेथे बोलावण्यात आले. गाव जमा झाला. पोलिसांनाही बोलावले. संसर्गाची भिती असण्याच्या काळात या चौघांविरोधी वातावरण तयार झाले. दोन्ही मुली संवाद साधण्याचा प्रयत्न करत होत्या. घरमालकाजवळ बोला. अशी विनंती करत होत्या. पण कोणीच ऐकले नाही. चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

या कथेचा पहिला भाग वाचण्यासाठी पुढिल लिंकवर क्लिक करा-  अखेर महिनाभराने तीनही भावंडे आई-वडिलांच्या कुशीत....


गोठलेली माणुसकी अनुभवली.
फ्लॅट संस्कृतीत एकाच इमारतीत राहणार्‍या कुटुंबांना इतरांशी काही देणेघेणे नसते. अशा वातावरणात वाढलेल्यांना क्षणात जमा झालेला गाव पाहून आर्श्चयाचा धक्का बसला. भय, मत्सर, मित्राने दिलेला आधार, शासनाची हतबलता यासह कोरोनाच्या भीतीने गोठलेली माणुसकी त्यांनी अनुभवली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.