लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे.
साडवली : तीन राज्यांत विजय मिळवून भाजपने उपांत्य फेरी जिंकली आहे. मिळालेले यश पाहता फायनल जिंकल्याचाच हा निर्णय आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) चारशे खासदार महायुतीचेच असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) हेच पंतप्रधान असतील, असे ठाम मत माजी आमदार प्रमोद जठार (Pramod Jathar) यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची भाकरी मतदार परतणार असून कोकणात रखडलेले सर्व प्रकल्प आम्ही महायुतीच्या माध्यमातून परत आणणार आहोत. त्यामुळे कोकणचे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही माजी आमदार जठार यांनी देवरुख भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभा प्रवास योजनेचा पहिला टप्पा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पार पाडला. आता चिपळूण-संगमेश्वर विधानसभा परिक्षेत्रात घर घर चलो अभियान सुरु केल्याची माहिती जठार यांनी दिली. जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्र, बूथ कमिट्या अशा सर्वांसोबत बैठका घेऊन मतदारांचा कौल जाणुन घेतला जात आहे. त्यामध्ये आता बदलाची भूमिका दिसत आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे. चिपळुण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र निरीक्षक प्रमोद अधटराव, तालुका प्रमुख रूपेश कदम, जिल्हा महिला सरचिटणीस संगीता जाधव यांच्यासोबत सर्व पदाधिकारी या प्रवास अभियानात सामील झाले आहेत.
ते म्हणाले, विनायक राऊत यांनी खासदार असूनही काहीही विकासकामे केली नाहीत. हजारो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प होऊ दिले नाहीत. कोकणचा खंबाठा होऊ नये, यासाठी मतदारच विद्यमान खासदारांना घरी बसवणार आहेत. कोकणात आलेले प्रकल्प यांनी अडवले, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. तरुण वर्ग शहराकडे वळला, घरे ओस पडली, शाळा बंद पडल्या आहेत. यापुढे असे होवू नये, यासाठीच खासदार बदलणे हाच पर्याय मतदारांजवळ शिल्लक राहिला आहे. महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठ नेते उमेदवारी जाहीर करतील ती आम्हांला मान्य असेल. महायुतीचाच खासदार असेल यात कोणतीही शंका नाही.
केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य यांच्यात करार झाला असून पर्यटन स्थळांवर रोप-वे कार प्रकल्प उभारण्यासाठी ८० प्रस्ताव तयार करावयाचे आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर व परशुराम मंदिर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गगनबावडा व आंबोली असे चार प्रस्ताव पाठवले आहेत. या प्रकल्पांमुळे पर्वतरांगातील ही स्थळे पर्यटनासाठी अधिक बळकटी देतील. केंद्र सरकार ७५ टक्के व राज्य सरकार २५ टक्के निधी देणार आहे, असे जठार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.