व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांना सापळा रचून अटक; वनविभाग-पोलिसांची मोठी कारवाई

व्हेल माशाच्या उलटीची (Whale Fish Vomit) तस्करी करणाऱ्या चौघांना वनविभाग आणि पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
Whale Fish Vomit Smuggling
Whale Fish Vomit Smugglingesakal
Updated on
Summary

गगनबावडा पोलिसांनी गगनबावडा येथे नाकाबंदी करून मोटारीसह संशयितांना ताब्यात घेतले.

राजापूर : व्हेल माशाच्या उलटीची (Whale Fish Vomit) तस्करी करणाऱ्या चौघांना वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे-पाचल रस्त्यावर हा प्रकार रविवारी (ता. ५) घडला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Whale Fish Vomit Smuggling
राधानगरी धरणाचा पर्यटन विकास दृष्टिपथात; आराखडा मंजुरी अंतिम टप्प्यात, 31 कोटी 32 लाखांचा प्रस्ताव

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार राजापूर (Rajapur) तालुक्यातील पाचल-ताम्हाणे रस्त्यावर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने पाचल ते ताम्हाणे मार्गावर सापळा रचला. दरम्यान, राजकुमार सुरेश शेलार (वय ३३), आकाश राजेद्र घाडगे (२९) आणि रुपेश गणपत म्हात्रे (३९) हे मोटारीतून व्हेल माशाच्या उलटीची खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पथकातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जंगलात घुसलेल्या आरोपींचा पाठलाग केला तर उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोटारीचा पाठलाग केला. जंगलात पळून गेलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. मोटारीतील संशयित मात्र नेर्लेमार्गे गगनबावडा, भुईबावडा दिशेने निघून गेले. परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला. गगनबावडा पोलिसांशी संपर्क करून पळालेले संशयित व वाहनाविषयी माहिती दिली. गगनबावडा पोलिसांनी गगनबावडा येथे नाकाबंदी करून मोटारीसह संशयितांना ताब्यात घेतले.

Whale Fish Vomit Smuggling
गोव्याच्या पर्यटन धोरणाचा मालवणला मोठा फटका; पर्यटन पॅकेज सुविधेत बदल, पर्यटकांची संख्याही रोडावली

या प्रकरणी वनपाल राजापूर यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी (ता. ९) न्यायालयाने १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रत्नागिरी येथील कारागृहामध्ये संशयितांची रवानगी केली आहे.

Whale Fish Vomit Smuggling
Olive Ridley Turtles : गुहागर समुद्रात कासवाची 108 पिल्ले विसावली; तब्बल 10 हजार 538 अंड्यांचं संरक्षण

ही कारवाई विभागीय वनअधिकारी दीपक खाडे व सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, कर्मचारी वनपाल सदानंद घाडगे, रामदास खोत व दिलीप आरेकर तसेच वनरक्षक अरुण माळी, सहयोग कराडे, प्रभू साबणे, विक्रम कुंभार, श्रावणी पवार, सिद्धेश्वर गायकवाड, आकाश कडूकर, सूरज तेली, रणजित पाटील, राजाराम पाटील व वाहनचालक अंकुश तांबट, रेस्क्यू टिम राजापूरचे विजय म्हादये, नीतेश गुरव यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.