सध्याच्या वाढत्या महागाईमध्ये गणेशभक्तांना एकप्रकारे दिलासा मिळताना गणेशभक्तांसाठी प्रसादाची चव अधिक अविट झाली आहे.
राजापूर : अवघ्या एका दिवसांवर गणेशोत्सव (Ganeshotsav) येऊन ठेपलेला असताना जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचे भावही गगनाला भिडलेले आहेत. बाप्पाच्या प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या फळांच्या (Fruits) दरांमध्येही गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फारशी वाढ न होता स्थिर आहेत.
त्यामुळे सध्याच्या वाढत्या महागाईमध्ये गणेशभक्तांना एकप्रकारे दिलासा मिळताना गणेशभक्तांसाठी प्रसादाची चव अधिक अविट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्वच वस्तूंचे दर सातत्याने वाढत चालले आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी, विविध भाज्या आदी जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचा समावेश आहे.
या वाढत जाणार्या दरांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल बनले आहे. या वाढत्या महागाईमध्ये ‘बाप्पाचे’ आगमन होत आहे. बाप्पासाठी आरासासाठी वापरण्यात येणार्या मखरांसह अन्य विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहे. या व्यतिरिक्त रोषणाईसाठी वापरण्यात येत असलेली विविध प्रकारची लाईटिंग आणि अन्य साहित्यही मोठ्याप्रमाणात दाखल झाले आहे.
या साऱ्यांच्या वाढलेल्या दरामध्ये अन् त्यातून झालेल्या महागाईमध्ये लाडक्या बाप्पाचे स्वागत कसे करणार? अशी चिंता सर्वसामान्यांना पडली आहे. मात्र श्रींच्या प्रसादासाठी वापरण्यात येत असलेल्या विविधांगी फळांचे दरही स्थिर आहे.
फळाचे नाव दर (प्रति किलो)
सफरचंद १६०-१८० रू.
मोसंबी १२० रू.
केळी (डझन) ५०-६० रू.
नासपती २०० रू.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.