Teacher : निवडणुका, जनगणनेनंतर आता शिक्षक करणार चहा वाटपाचं नियोजन

Teacher
Teacher Sakal
Updated on

निवडणुकांची कामं किंवा जनगणनेच्या कामांसाठी आतापर्यंत शिक्षकांना कामला लावलं जात होतं हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. यावरून अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवले आहेत. मात्र, आता वरील दोन कामांनंतर शिक्षकांवर गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना चहा वाटपाच्या नियोजनाच्या कामची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चहा वाटपाची ही जबाबदारी एसटी आगारात लावण्यात आली आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आदेश काढले असून, या आदेशानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. चहा वाटपाची ही जबाबदारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना लावण्यात आली असून, काँग्रेसकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Teacher
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

सत्यजीत तांबेंकडून केसरकरांवर निशाणा

दरम्यान, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या या आदेशावर काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला असून, "कोकणातील शिक्षकांना गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्या लोकांसाठी चहापान व्यवस्था करण्याचे आदेश काढणाऱ्या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध. बरं राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर हे कोकणातीलच आहेत. शिक्षकांना शिक्षण सोडून इतर कामे द्यायची व शैक्षणिक गुणवत्तेवरून जबाबदारही धरायचं. वा रे!" अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही ट्वीट करत केली आहे.

Teacher
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

रत्नागिरी जिल्ह्यातल्या केवळ राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. दररोज तीन शिक्षक हे किमान आठ आठ तास एसटी आगारात ड्युटी करणार असून, राजापूर तालुक्यात जवळपास 850 शिक्षकापैकी 39 शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. हा निर्णय प्रांत आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. कडू यांनी सांगितले आहे. मात्र, या निर्णयाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.