वेध गणेशोत्सवाचे : गावाकडे यायचे असेल तर चाकरमान्यांना आता एवढे दिवस व्हावे लागणार क्‍वारंटाईन...

ganesha festival  Preparation in kokan ratnagiri  mumbai people 14 day  Quarantine
ganesha festival Preparation in kokan ratnagiri mumbai people 14 day Quarantine
Updated on

रत्नागिरी : गणेशोत्सवाला कोकणात हजारो चाकरमानी दाखल होणार आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्यातून संक्रमण होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. गावातील लोकांमध्ये संक्रमण होऊ नये, यासाठी क्‍वारंटाईनचा कालावधी चौदा दिवसांचा राहावा, अशी तयारी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी सुरू केली आहे. त्या दृष्टीने गावात मानसिकता तयार करण्यावर भर दिला जात आहे.

गणेशोत्सवात कोकणातील गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारतर्फे एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणातील ग्रामपंचायतीदेखील चाकरमान्यांसाठी नियम आखण्यासाठी सरसावल्या आहेत. चाकरमान्यांना चौदा दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण करणे आवश्‍यक आहे. तसे ठराव किंवा आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यास सुरवात झाली आहे.

मुंबईकर चाकरमान्यांपर्यंत निरोपही धाडले जात आहेत. रत्नागिरीतील वरवडे, नाखरे या ग्रामपंचायतींनी चाकरमान्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे. गावाकडे यायचे असेल तर चाकरमान्यांनी चौदा दिवस अगोदर यावे, असे आवाहन ग्रामपंचायतींकडून केले आहे. ५ ऑगस्टनंतर गावी आल्यास कोणत्याही प्रकारचा दंड मात्र आकारला जाणार नाही; पण येणाऱ्या चाकरमान्यांनी सर्व काळजी घ्यावी, असा पवित्रा येथील लोकांनी घेतला आहे. क्वारंटाईन कालावधी १४ दिवस करण्यास ग्राम कृती दलाकडून मानसिकता बनविली जात आहे. सिंधुदुर्गमध्ये सरपंच संघटनेकडून तसे निवेदन दिले. 

मुंबईतच राहण्याची मानसिकता
क्‍वारंटाईन कालावधीवरून गावागावामध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता काही मुंबईकरांनी गणेशोत्सवात मुंबईतच राहण्याची मानसिकता केल्याचे चित्र आहे.

चाकरमानी गावी आल्यानंतर त्यांना रिकाम्या घरासह शाळांमध्ये क्‍वारंटाईनसाठी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. क्‍वारंटाईन कालावधी चौदा दिवस राहणे आवश्‍यक आहे. तसे झाले नाही तरीही काळजी घेऊन चाकरमान्यांचे स्वागत करू.
- विजय चव्हाण, सरपंच

गणेशोत्सवासाठी वरवडे गावात बाहेरून येणाऱ्या लोकांचा सर्व्हे केला आहे. संसर्ग लक्षात घेता आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी क्‍वारंटाईन कालावधी अधिक पाहिजे. चाकरमान्यांच्या स्वागताला आम्ही सज्ज आहोत.
- निखिल बोरकर, सरपंच, वरवडे

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.