Ganeshotsav 2023 : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ; कशेडी बोगद्यातून एकेरी वाहतूक, पोलिसांकडून कोंडी फोडण्याचा प्रयत्न

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमानांच्या खासगी चारचाकी वाहनांची संख्या महामार्गावर मोठी होती.
Ganeshotsav Mumbai Goa Highway
Ganeshotsav Mumbai Goa Highwayesakal
Updated on
Summary

चारही मार्गावरील वाहने बहादूरशेख नाक्यावरील सर्कलवर आली तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

चिपळूण : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) मुंबई, पुण्यातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात महामार्गाने गावी येण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे कालपासून महामार्गावर (Mumbai-Goa Highway) वाहनांची गर्दी दिसत आहे. मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमानांना कशेडी बोगद्यातून (Kashedi Tunnel) प्रवेश दिला जात आहे.

खेडहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकांना जुन्या कशेडी घाटमार्गे प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे काही अंतरावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला आहे. गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमानांच्या खासगी चारचाकी वाहनांची संख्या महामार्गावर मोठी होती.

Ganeshotsav Mumbai Goa Highway
Ganesh Chaturthi : दोन शतकांची परंपरा लाभलेल्या सांगली संस्थानच्या 'चोर गणपती'चं आगमन; काय आहे खासियत?

तसेच सकाळपासून एसटी बस, मिनी बस, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या वाहनांची संख्या मोठी होती. चाकरमानी स्वतःच्या दुचाकी, चार चाकी आणि तीन चाकी वाहनांनी गावाकडे येत होते. शहरातील बहादूरशेख नाका येथे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी शनिवारी शांतता कमिटीच्या बैठकीनंतर बहादूरशेख नाक्याची पाहणी केली. येथे वाहतूक कोंडी होऊ नये अशा पोलिसांना सूचना केल्या.

Ganeshotsav Mumbai Goa Highway
Eknath Shinde : मनोज जरांगेंची मागणी असली, तरी मराठ्यांना OBC तून सरसकट आरक्षण मिळणार नाही; CM शिंदेंचं मोठं विधान

काल उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने सकाळी आठ वाजल्यापासून बहादूरशेख नाक्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह प्रयत्न करीत होते. बहादूरशेख नाक्यावरून मुंबईकडे, चिपळूण शहरात, गोव्याकडे आणि कराडच्या दिशेने जाण्यासाठी चार मार्ग आहेत. चारही मार्गावरील वाहने बहादूरशेख नाक्यावरील सर्कलवर आली तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन मार्गावरील वाहने थांबून एका मार्गावरील वाहने सोडली जात होती.

Ganeshotsav Mumbai Goa Highway
Shambhuraj Desai : गणेशोत्सवाबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले महत्त्वाचे आदेश; देसाई म्हणाले, गालबोट लागेल असं..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.