Ganeshotsav : चांद्रयान ३, विठ्ठलाच्या देखाव्याचेआकर्षण घरगुती गणेशोत्सव,चलचित्रातून सामाजिक संदेश

शहरातील घरगुती गणेशोत्सव आणि देखावे यांचे अतुट नाते आहे.
ratnagiri
ratnagiri sakal
Updated on

चिपळूण - आबालवृद्धांचे लाडके दैवत असणाऱ्या विघ्नहर्त्याचे चिपळूण नगरीत उत्साही वातावरणात आगमन झाले आहे. घरगुती गणेशो त्सवातही छोटे-मोठे देखावे, चलचित्र व समाजाला संदेश देणाऱ्या सजावट करण्यावर भर दिला जातो. यंदा चिपळूणच नव्हे, तर जिल्ह्यात अनेकांच्या घरी चांद्रयान ३, अन् विठ्ठलाच्या देखाव्यांचे विशेष आकर्षण दिसून येत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

शहरातील घरगुती गणेशोत्सव आणि देखावे यांचे अतुट नाते आहे. त्यामुळे शहरातील अनेक घरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत घरगुती देखावा पाहायला मिळतो. शहरासह ग्रामीण भागातही बहुतांशी घरात गणेशोत्सवाच्या कालावधीत चलतचित्राचे देखावे करण्याची परंपरा आहे. यंदा अनेकांनी आपल्या घरातील गणपती बाप्पांसमोर असे देखावे साकारले आहेत. हे आकर्षक देखावे पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे.

सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक अशा विविध विषयांवरील देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्‍नही या माध्यमातूनमांडले जातात. घरगुती देखावे तयार करण्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी केली जाते. काहींनी तयार देखावे आणले असले तरी काहींनी कलाकुसरीने तयार केलेले देखावे व चलतचित्र तितकेच आकर्षक ठरत आहेत. यामध्ये चांद्रयान ३, पांडुरंग अर्थात विठ्ठलाची प्रतिमा उभारली आहेत.

ratnagiri
Beed : ‘होल वावर इज आवर’ म्हणत भरला पीकविमा २७४ बोगस शेतकऱ्यांची करामत ६४ कोटी हडपण्याचा डाव उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()