Nivali Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात गॅस टँकर उलटला; तब्बल पाच तास अवजड वाहतूक बंद

अवजड वाहनांची महामार्गावर झाली होती पाच तास कोंडी
Gas tanker accident at Nivali Ghat Ratnagiri
Gas tanker accident at Nivali Ghat Ratnagiriesakal
Updated on
Summary

जयगड येथून हा टॅंकर गॅस भरून नाशिकला जात होता; परंतु निवळी घाटात अचानक टॅंकरचा ब्रेक निकामी झाला.

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) निवळी घाटात (Nivali Ghat) गॅस टँकरचा ब्रेक निकामी होऊ झालेल्या अपघातात टॅंकर रस्त्यात उलटला. त्यामुळे पाच तास महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होती. सुदैवाने, या अपघातात गॅस गळती झालेली नाही.

अपघातग्रस्त टॅंकर (Gas Tanker) रस्त्यातच आडवा झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. गॅस तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत टीम आली नव्हती. दुचाकी, चारचाकी गाड्या मात्र सोडल्या जात होत्या. हातखंबा वाहतूक मदत केंद्र, ग्रामीण पोलिस कर्मचारी, अधिकारी सुरक्षेच्यादृष्टीने घटनास्थळी दाखल आहेत.

Gas tanker accident at Nivali Ghat Ratnagiri
Chitra Wagh : भाजप सरकार आलं म्हणून महिलांवर अत्याचार वाढलेत, असं म्हणायचं का? चित्रा वाघ यांचा थेट सवाल

दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, तालुक्यातील जयगड येथून हा टॅंकर गॅस भरून नाशिकला जात होता; परंतु निवळी घाटात अचानक टॅंकरचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. टॅंकर रस्त्यात उलटून हा अपघात झाला. अपघातामध्ये केबिन बाजूच्या दरडीवर आदळली तर गॅसटाकी मुख्य रस्त्यावर आडवी झाली. त्यामुळे महामार्ग बंद झाला.

Gas tanker accident at Nivali Ghat Ratnagiri
Satara Crime : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पवारांचा काढला काटा; गळा आवळून, हात-पाय बांधून मृतदेह फेकला कालव्‍यात

सुरक्षेच्यादृष्टीने तत्काळ हातखंबा वाहतूक मदतकेंद्राचे पोलिस आणि ग्रामीण पोलिसांनी लांब वाहने थांबवून गॅस गळती झाली आहे की नाही, याची खात्री केली. सुदैवाने, गॅस गळती झाली नाही. याबाबत तत्काळ गॅस कंपनीला कळवण्यात आले आहे.

दरम्यान, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. अखेर पोलिसांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी जागा केली; परंतु अवजड वाहने जाण्यासारखी जागा नसल्याने अवजड वाहनांची महामार्गावर पाच तास कोंडी झाली होती. उशिरापर्यंत गॅस तज्ज्ञांची टीम आली नव्हती.

Gas tanker accident at Nivali Ghat Ratnagiri
हृदय पिळवटून टाकणारी घटना! आजी, आजोबासह नातीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; घरात एकमेकांना चिकटून पडले होते मृतदेह

अग्निशामक दलाची मदत...

रत्नागिरी येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, दाभोळ घाटातही टॅंकरचा अपघात झाला. हातखंबा वाहतूक मदत केंद्राची दुसरे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. एकमेकांवर गाड्या आदळून हा अपघात झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()