प्रेमप्रकरणात मुलगी ठरत होती अडसर ;प्रियकरासह रचला कट

पतीकडून नाडलेली; प्रियकरासह रचला कट, पोलिस तपासात झाला उघड
girl was becoming obstacle love affair ratnagiri
girl was becoming obstacle love affair ratnagirisakal
Updated on

रत्नागिरी : पांगरी (ता. संगमेश्‍वर) येथे दीड वर्षाची वहाळात सापडलेली बालिका मातेच्या प्रेमप्रकरणात अडसर ठरत होती. त्यामुळे तिला संपवण्याच्या उद्देशाने वहाळात टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली. २३ जानेवारीला दुपारच्या सुमारास पऱ्ह्यातील चार दगडांमध्ये बालिकेला टाकून मातेने प्रियकरासह पोबारा केला होता.

girl was becoming obstacle love affair ratnagiri
संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता महिला फाइटर पायलट होणार पर्मनंट

पोलिसांनी सांगितले, की पांगरी येथील गावपऱ्ह्यात २५ जानेवारीला बालिका सापडली होती. पोलिसांनी बालिकेची आई सांची कांबळे (वय २६) व मिथिलेश डांगे यांना याप्रकरणी अटक केली. सांचीचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला चार वर्षांचा मुलगा आहे. पती तिच्यावर संशय घेत होता. पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे तिही त्याला कंटाळली होती. याचदरम्यान तिची मिथिलेश डांगे याच्याशी ओळख झाली आणि त्यातून प्रेमसंबंध जुळले. दीड वर्षापूर्वी ही बालिका जन्माला आली; मात्र नवऱ्याला तिचा संशय येत होता. त्याने या मुलीला स्वीकारले नाही. तो आपल्या मुलाला घेऊन निघून गेला. पतीने सोडल्यानंतर ती आईकडे कुवारबाव येथे येऊन राहू लागली. त्यानंतर मिथिलेशच आधार झाला. नवऱ्याने सोडल्यामुळे मिथिलेशचे तिच्या घरी येणे, बाहेर फिरायला जाणे वाढले. त्यांच्यात लग्नाच्या गोष्टी होत होत्या; मात्र ही मुलगी त्यांच्यात अडसर ठरत होती. मुलीमुळे तो तिला स्वीकारायला तयार नव्हता. शेवटी त्यांनी मुलीला संपवायचा कट रचला. अनेक प्रकारच्या शक्कल लढवल्यानंतर तिला जंगलमय निर्जनस्थळी ठेवायचे ठरले. परंतु, तशी जागा त्यांना सापडत नव्हती.

girl was becoming obstacle love affair ratnagiri
TRAI कडून मार्चमध्ये 5G साठी शिफारस; 2022 मध्ये सुरु होईल सेवा

डिसेंबर महिन्याच्या दरम्यान ते दोघेही पांगरी येथे फिरण्यासाठी गेले. तेव्हा ही जागा त्यांनी हेरली. त्याचे नातेवाईक हे याच गावातील असल्यामुळे या ठिकाणची माहिती त्याला होतीच. गावपऱ्या ही अडगळीची जागा असल्यामुळे तिकडे कोणी जात नाही, हे त्यांना कळले. २३ जानेवारीला साडेअकरा ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी पांगरी येथील पऱ्ह्यामध्ये ४ दगडांत बालिकेला ठेवून तेथून पोबारा केला, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली.

ग्रामसेवक अखिलेश गमरेची मायेची ऊब

पांगरी येथे २५ जानेवारीला सापडलेल्या बालिकेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. देवरुख पोलिस ठाण्यातून दररोज महिला पोलिस कर्मचारी पाहणीसाठी जात होत्या. या मुलीला ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हापासून पांगरी गावचे ग्रामसेवक अखिलेश गमरे अथक परिश्रम घेत आहेत. तिची काळजी घेत आहेत. त्यांची पत्नीही मुलीच्या देखभालीसाठी जिल्हा रुग्णालयात आहे. दोघेही त्या बालिकेची काळजी घेत आहेत.

बालिकेला पऱ्ह्यात टाकणारी माताच दुसऱ्या विवाहासाठी आग्रही होती. म्हणून ती लग्नासाठी प्रियकाराच्या मागे लागली. मात्र, दुसरी दीड वर्षाची मुलगी अडसर वाटत होती. तिचा पहिलाही प्रेमविवाह असून तिला सात वर्षांचा मुलगा आहे. आता दुसरे लग्न व्हावे यासाठी तिने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले.

- उदय झावरे, पोलिस निरीक्षक, संगमेश्‍वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()