म्हादईची कायदेशीर लढाई सरकार निश्चितच जिंकेल, पण महाराष्ट्रानेही..; काय म्हणाले मुख्यमंत्री सावंत?

गोव्याच्या म्हादई नदी प्रश्नावर कर्नाटकशी लढण्यास गोवा सरकारचे कायदेशीर पथक काम करत आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantesakal
Updated on
Summary

म्हादईची कायदेशीर लढाई सरकार निश्चितच जिंकेल. मात्र, महाराष्ट्रानेही आम्हाला सहकार्य करावे.

सावंतवाडी : म्हादई नदी (Mhadei River Water Issue) प्रश्नावर कर्नाटकशी लढण्यास गोवा सरकार (Goa Government) सक्षम आहे. त्यामुळे म्हादईची कायदेशीर लढाई सरकार निश्चितच जिंकेल. मात्र, महाराष्ट्रानेही आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री सावंत (CM Pramod Sawant) यांनी व्यक्त केली.

सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील श्री देवी भावईचे आणि कुलस्वामिनी भवानी देवीचे दर्शन आणि येथील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी मुख्यमंत्री सावंत येथे आले होते. या वेळी त्यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

CM Pramod Sawant
Prakash Ambedkar : नरेंद्र मोदींची नावालाच 56 इंच छाती, ते लोकशाहीसाठी धोकादायक आहेत; प्रकाश आंबेडकरांची टीका

सावंत म्हणाले, ‘गोव्याच्या म्हादई नदी प्रश्नावर कर्नाटकशी लढण्यास गोवा सरकारचे कायदेशीर पथक काम करत आहे. त्यामुळे ही लढाई गोवा निश्चितच जिंकणार, अशी खात्री आहे; परंतु या प्रश्नावर महाराष्ट्रानेही सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यातील चार राज्यात मी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती.

CM Pramod Sawant
Bidri Election : जिल्हाध्यक्षांच्या पराभवासाठी थेट मंत्रीच मैदानात; मुश्रीफ-चंद्रकांतदादांनी आखली रणनीती, कोणाचा होणार पराभव?

पाचपैकी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये कमळ फुलणार आहे. अन्य दोन राज्यात विरोधकांना भाजप काटे की टक्कर देणार आहे. महाराष्ट्रातही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपला जिंकायच्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या दोन्ही निवडणुकांमध्ये कमळ फुलण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()