Raigad : तळियेतील दरडग्रस्‍तांना लॉटरी पद्धतीने मिळाली घरे

कोंडाळकरवाडीतील दरडग्रस्तांना तातडीने घरे बांधून देण्याची आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. तर ही नवीन घरे बांधण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली होती.
raigad
raigadsakal
Updated on

Raigad - दरड पडल्‍याने सर्वस्व गमावलेल्या महाड तालुक्यातील तळिये येथील दरडग्रस्तांना सरकारकडून अखेर लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करण्यात आले. तर नवीन शैक्षणिक वर्षात प्राथमिक वर्गातील मुलांनाही शाळेची नवीन इमारत बांधून मिळाली आहे. म्हाडाकडून ही घरे बांधण्यात आली असून लवकरच ग्रामस्थ नव्या घरात स्थलांतरित होणार आहेत.

raigad
Mumbai News : गर्दीचा उच्चांक! एसी लोकलचे दरवाजे बंद होता होईना!

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत महाड तालुक्यातील तळिये येथील कोंडाळकरवाडीवर दरड कोसळून ८७ लोकांना जीव गमवावा लागला होता. तर ६६ घरे दरडीखाली गाडली गेली. या गावातील ६६ कुटुंबे बेघर झाली होती.

कोंडाळकरवाडीतील दरडग्रस्तांना तातडीने घरे बांधून देण्याची आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. तर ही नवीन घरे बांधण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली होती. त्यानुसार ६६ टुमदार घरांची कामे पूर्ण झाली आहे.

दोन वर्षांपासून तळियेतील दरडग्रस्त कंटेनरमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्यांना बांधून दिलेली घरे ग्रामस्थांच्या नावावर करण्यापूर्वी प्लॉटचे वाटप करणे महत्त्वाचे असल्याने महसूल विभागाकडून शनिवारी, (ता. १७) लॉटरी पद्धतीने एका लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून ६६ प्लॉटचे वाटप केले. महिनाभरामध्ये प्लॉटधारकांना घरे हस्तांतरित केली जाणार आहेत.

raigad
Pune Cime : मंचर येथील सेवानिवृत्त पोलीस अमलदार पंढरीनाथ थोरात खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक

प्लॉटधारकांच्या नावे जमीन करणे, गावठाण करणे, वीजमीटर, नळ पाणीपुरवठा या सर्व कामांमध्ये कोणती अडचण येऊ नये, याकरता हे वाटप करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला महाडचे प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, तत्कालीन प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार महेश शितोळे, तत्कालीन तहसीलदार सुरेश काशीद, नथुराम कोंढाळकर, सरपंच सोनाली पांडे, उपसरपंच विजय पांडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

नागरी सुविधांचेही लोकार्पण

ग्रामस्थांचे पुनर्वसन केलेल्या ठिकाणी विविध नागरी सुविधाही पुरवण्यात आल्‍या आहेत. यात शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, समाजमंदिराचा समावेश आहे. तळियेत दरड कोसळल्याने जिल्हा परिषदेची शाळाही धोकादायक बनली होती.

raigad
Mumbai Crime : 7 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक

त्यामुळे दोन वर्षांपासून शाळाही कंटेनरमध्येच भरत होती. नव्याने संपादित केलेल्या जागेमध्ये शाळेची नवीन इमारत बांधण्यात आली असून या वर्षी दरडग्रस्त गावातील मुले नव्या शाळेत दाखल झाली आहेत.

शाळेचे उद्‌घाटन आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उर्वरित ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, समाजमंदिर, बसथांबा इ. नागरी सुविधांचेही गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी सभापती सपना मालुसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर व चंद्रकांत कळंबे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.