Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला; घरोघरी भेटीतून मतांचा जोगवा; ५ नोव्हेंबर रोजी मतदान

घरोघरी भेटीतून मतांचा जोगवा; श्रेयवादाचे राजकारण
gram panchayat election 5 nov 2023 voting day raigad poladpur political campaigning strategies
gram panchayat election 5 nov 2023 voting day raigad poladpur political campaigning strategiesSakal
Updated on

पोलादपूर : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींपैकी चार ठिकाणी सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्‍या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहचला आहे.

उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी भेट देत मतांचा जोगवा मागत आहेत. रात्रीच्या वेळी बैठकी घेण्यात हाेत असून प्रचाराची रणनीती आखली जात आहे. पाचपैकी एक सरपंच ठाकरे गटाकडे तर चार शिंदे गटाकडे आहेत. उर्वरित ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.

तालुक्‍यात १७ ग्रामपंचायतमधील ४४ प्रभागात ९३ सदस्यांसाठी १८९ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारात ठाकरे गटाने आघाडी घेतली असून सवाद गावात नुकतीच प्रचार फेरी काढण्यात आली होती. या वेळी युवा नेते श्रेयश जगताप, सोमनाथ ओझर्डे, ज्ञानेश्वर तुर्डे, प्रवीण तुर्डे, सागर शिंदे, दत्ता गरुड, तय्यब भाई तारलेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यातील देवळे व कापडे ग्रामपंचायतीमध्ये निर्णायक लढत होण्याची शक्‍यता आहे. पोलादपूर ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर कापडे ग्रामपंचायत मोठी तसेच राज्यमार्गालगत असल्याने या ग्रामपंचायतीला महत्त्व प्राप्त झाले आहे तर देवळे ग्रामपंचायतीत दरदग्रस्त केवनाळे गावाचा समावेश असल्याने त्यांच्या घराचा प्रश्न व स्थलांतराचा प्रश्‍न महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आगामी निवडणुकांची तयारी

बहुतांश ग्रामपंचायतीत स्थानिक व हक्काचा उमेदवार निवडून येत असल्याने गावपातळीवरील प्रचारावर भर दिला जात आहे. निवडणुकीदरम्यान पोलादपूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे भवितव्य अधोरेखित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.