Bhaskar Jadhav : कोरोना, चक्रीवादळाच्या काळात महिलांना साड्या वाटणारे होते कुठे? भास्कर जाधवांचा सवाल

MLA Bhaskar Jadhav : निवडणूक आल्यामुळे भाजपची (BJP) मंडळी आज गावागावांत जाऊन महिलांना साड्या वाटप करत आहेत.
MLA Bhaskar Jadhav
MLA Bhaskar Jadhavesakal
Updated on
Summary

कोरोनाच्या काळात लोकांना औषधे, धान्य पुरवण्यापासून मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांना गावात घेतलं पाहिजे यासाठी प्रबोधन करण्यापर्यंतचे काम आम्ही केले.

चिपळूण : निवडणूक आल्यामुळे भाजपची (BJP) मंडळी आज गावागावांत जाऊन महिलांना साड्या वाटप करत आहेत; परंतु, कोरोनाच्या संकटकाळात त्याचबरोबर निसर्ग, तौक्ते यासारख्या चक्रीवादळाच्या काळात ही मंडळी होती कुठे, असा सवाल आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पुणेकरांच्या मेळाव्यात काढले.

पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गुहागर मतदारसंघातील (Guhagar Constituency) रहिवाशांचा मेळावा पुण्यातील चांदणी लॉन्स येथे झाला. मेळाव्याला गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यातील हजारोंच्या संख्येने पुणेकर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात लोकांना औषधे, धान्य पुरवण्यापासून मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांना गावात घेतलं पाहिजे यासाठी प्रबोधन करण्यापर्यंतचे काम आम्ही केले. वेगवेगळ्या चक्रीवादळांच्या काळात नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम केले.

MLA Bhaskar Jadhav
'तुमच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार, RPI मध्ये या'; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर

त्या वेळी सध्या साडीवाटप करणारी भाजपची मंडळी घरात बसलेली होती, अशी घणाघाती टीका आमदार जाधव यांनी केली. तत्कालिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केलेल्या विकासकामांना स्थगिती दिली. मेळाव्याला शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरपुडे, पृथ्वीराज सुतार, गुहागर प्रकाश महाडिक, सविता मते आदी उपस्थित होते.

MLA Bhaskar Jadhav
'हिंदू-मुस्लिम भाई-भाई' नारा देऊन कर्दनकाळ असणाऱ्या शत्रूंना आपण जवळ करीत आहोत; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

लाडकी बहीणपासून 5 कोटी महिला वंचित

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा केवळ गवगवा आहे. राज्यात ६ कोटी ५३ लाख महिलांपैकी केवळ १ कोटी १३ लाख महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित ५ कोटी ४० लाख महिला या योजनेपासून वंचित आहेत, असेही आमदार जाधव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()