..अखेर पायपीट संपली; हर्णेत लसीकरण मोहीम फत्ते

..अखेर पायपीट संपली; हर्णेत लसीकरण मोहीम फत्ते
Updated on

हर्णे (रत्नागिरी): हर्णे ग्रामपंचायत (Harne Gram Panchayat)तर्फे जिल्हा परिषद मराठी शाळा हर्णे येथे प्रथमच आयोजित केलेली लसीकरणाची मोहीम (Vaccination campaign)मोठ्या उत्साहात पार पडली. हर्णे मधील नागरिकांना लसीकरणासाठी आसूद प्राथमिक आरोग्य केंद्रात (Aasud health center)जावे लागत होते. गावाच्या लोकसंख्येच्या मनाने या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खूपच गर्दी होत होती. कारण इतर आजूबाजूच्या गावातील नागरिक याच ठिकाणी लसीकरणासाठी येत होते. त्यामुळे काही वेळेस बहुतांशी वयस्कर ग्रामस्थानां लस न घेताच माघारी फिरावे लागत होते.

यामुळे कोणी वैयक्तिक रिक्षा करून जात तर कोणी मिळेल त्या वाहनाने जात असे. त्यात कोरोनामुळे सगळी वाहने बंदच असल्यामुळे माघारी फिरताना वाहन नाही मिळालं की रखंडपट्टी व्हायची आणि सकाळी लसीकरणासाठी गेलेली व्यक्ती सायंकाळी उपाशीच घरी परतत. याचाच विचार करून हर्णे ग्रामपंचायतीने सदरचे लसीकरणच आपल्या गावामध्येच घ्यायचे ठरवले. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी त्या कामाला लागले. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश आले. त्याप्रमाणे मंगळवार ता. ०१.०६.२०२१ रोजी सकाळी ९ .०० ते दुपारी ३.०० या कालावधीत जिल्हा परिषद मराठी शाळा हर्णे येथे ४५ वर्षावरील लाभार्थ्यासाठी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस देणेत आला .

लसीकरणासाठी १४० डोस प्राप्त झाले होते , त्यामध्ये कोवीड १९ मध्ये प्राधान्याने काम करणारे फ्रंट लाईन कर्मचारी यांचेसाठी ४० डोस व उर्वरीत १०० डोस ४५ वर्षावरील ग्रामस्थांना देणेत आले. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला.यावेळी ग्रामपंचायतीकडून तालुक्याचे आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी- लक्ष्मीनारायण मिश्रा, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. आशिष मारकड, आसूद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी- डॉ. कुलभूषण शिंदे, भरत जोशी, आरोग्यविभागाचे कर्मचारी, आशा कर्मचारी आदी मान्यवर व्यक्तींचे सदर लसीकरणासाठी मंजुरी मिळण्यासाठी व हे लसीकरण पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य लाभले याकरिता ग्रामपंचायतीकडून यावेळी त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.