कोरोनाचा कहर : जिल्ह्यात एका रात्रीत वाढले 35 कोरोनाबाधित, कुठे ते वाचा....

corona
corona
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यात तब्बल 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्‍यात सर्वाधिक 15 रुग्ण बाधित आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 554 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे.
प्राप्त अहवालानुसार कळंबोळी 4, राजापूर 1, रत्नागिरी 15, कामसे 10, लांजा 1 आणि दापोली 4 या रुग्णांचा समावेश आहे. कोविड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 8 तर समाजकल्याण, रत्नागिरी येथून 15 असे 23 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 400 झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी नवीन रुग्ण सापडण्याची मालिका काही खंडित झालेली नाही. कोरोनाच कहर वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ग्रामीण भागाबरोबर आता शहरी भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या चोवीस तासात रग्णसंख्येमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे रत्नागिरीकरांची झोपच उडाली आहे. सध्या रुग्णालयात ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 154 झाली आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णांचा समावेश आहे. आज कारवांचीवाडी (रत्नागिरी) हे क्षेत्र कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात सध्या 48 ऍक्‍टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून त्यामध्ये रत्नागिरी तालुक्‍यात सर्वांत जास्त म्हणजे 19 गावांचा समावेश आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षात 52 कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. तर होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 797 ने घटली आहे. आजअखेर होम क्वारंटाईनखाली 22 हजार 342 संशयित आहेत. 

          जिल्ह्याची स्थिती

  • जिल्ह्यातील कोरोनाबाधित - 554 अहवाल पॉझिटिव्ह 
  • सध्या उपचार घेणारे- 154 
  • कोरोनामुक्त झालेले - 400 
  • आजअखेर झालेले मृत्यू - 24 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.