रोहा - गेली काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रोहे तालुक्यातील कोलाड भागात पुन्हा दमदार एकदा हजेरी लावली आहे.
बुधवारी (ता. २५) रोजी रोहे शहारासमवेत कोलाड, सुतारवाडी, कुडली, खांब, इत्यादी परिसरात दुपारपासून पावसाने हळूहळू बरसायला सुरुवात केली. परंतू थोड्या अवधीतच पावसाने आपले रौद्ररूप धारण करून धो धो स्वरूपात कोसळायला सुरुवात केल्याने सा-यांचीच त्रेधातिरपीट उडाली.
गेली काही दिवस पाऊस पडला नसल्याने वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. त्यामुळे प्रत्येकजण हैराण झाला तर भातशेतीलाही पाऊस पडल्याने जमिनीला भेगा पडल्या होत्या. अशातच पुन्हा कधी एकदा पाऊस सुरू होतोय याचीच सा-यांना प्रतिक्षा लागली होती.पावसाची प्रत्येकजण वाट पाहत असतानाच गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने हळूहळू पडायला सुरूवात केल्याने सा-यांनाच हायसे वाटले.
परतीच्या पावसाने आपले रौद्ररूप धारण करून धो धो स्वरूपात बरसायला सुरुवात केल्याने सा-यांचीच त्रेधातिरपीट उडाली. तर पडणाऱ्या पावसाने छोटे मोठे व्यावसायिक तसेच रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते यांनाही या पावसाचा चांगलाच फटका बसला. पडणा-या पावसाची तीव्रता इतकी होती की, एवढे दिवस कोरले पडलेले नदीनाले क्षणार्धात भरून वाहू लागले.तसेच शेती क्षेत्रालाही चांगला पाऊस मिळाल्याने शेती क्षेत्रातही पाणीच पाणी झाले.
पडणाऱा पाऊस सायंकाळ पर्यंत पडतच राहिला असल्याने नाक्यावर ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले होते.तर वाहतुकीवरही परिणाम झाल्याने वाहतूक मंद गतीने सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.