Chiplun Flood : मे महिन्याच्या कडक उन्हात स्वरगंधा नदीला प्रथमच पूर; 'या' गावात ढगफुटीसारखा पाऊस

अनारीच्या डोंगर भागात शुक्रवारी ढगफुटीसदृश कोसळलेल्या पावसाने गावातून वाहणाऱ्या नदीला पूर आला.
Chiplun Swargandha river floods
Chiplun Swargandha river floodsesakal
Updated on
Summary

गेली आठवडाभर चिपळूण शहरासह परिसराला वादळी पाऊस झोडपून काढत आहे. गुरुवारी झालेल्या वादळी पावसात तालुक्यातील विविध भागातील घरे, गोठ्यांसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

चिपळूण : अनारीच्या डोंगर भागात शुक्रवारी ढगफुटीसदृश कोसळलेल्या पावसाने गावातून वाहणाऱ्या नदीला पूर आला. मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हाळ्यात कोसळलेला पाऊस, नदीला आलेला पूर प्रथमच पाहिला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अनारी गावाच्या तीनही भागाला डोंगर असून मध्येच गाव आहे. या डोंगरभागासह गावात ढगफुटीसारखा पाऊस कोसळला.

साधारण दीड तास कोसळलेल्या पावसाने गावातून वाहणाऱ्या स्वरगंधा नदीची पाणीपातळी वाढली. पूर्ण कोरडी पडलेली ही नदी शुक्रवारी नदीपात्राबाहेर पडून वाहत होती. यामध्ये नदीवर सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम साहित्य वाहून गेले. पावसाने गावातील रस्ते पाण्याखाली गेले होते. सखल भाग जलमय झालेला असतानाच काहींच्या घरांभोवती, परिसरात पाणीच पाणी वाहत होते.

Chiplun Swargandha river floods
Konkan Tourism : हिरवेगार जंगल अन् निळाशार धबधबा..; हा निसर्गसोहळा अनुभवायचाय असेल, तर 'या' गावाला जरुर भेट द्या..

नदीवर सध्या पूल उभारणीचे काम सुरू आहे. यासाठी टाकलेल्या स्लॅबवरील लोखंडी प्लेटस्, पाण्याच्या टाकीसह बांधकाम साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. चक्क या पावसात गावातील वृक्षही कोसळले आहेत. सखल भागासह रस्तेही पूर्णतः पाण्याखाली जाऊन नदीचे स्वरूप आले होते.

गेले आठवडाभर चिपळूण शहरासह परिसराला वादळी पाऊस झोडपून काढत आहे. गुरुवारी झालेल्या वादळी पावसात तालुक्यातील विविध भागातील घरे, गोठ्यांसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. याबाबत तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करत आहेत. त्यामुळे एकूण किती नुकसान झाले हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. गुरुवारप्रमाणेच शुक्रवारी सायंकाळीही वादळी पावसाचा तडाखा सलग दुसऱ्या दिवशी तालुक्याला बसला.

Chiplun Swargandha river floods
Chemical Factory Chimney Collapsed : रासायनिक कारखान्याची तब्बल 32 मीटर उंचीची चिमणी कोसळली; कोट्यवधींचे नुकसान

तालुक्यातील अनारी गावात ढगफुटी झाली, मात्र ग्रामस्थांचे नुकसान झाले नाही. अनारीतील नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. गावात रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांचे नुकसान झाले. त्या पलीकडे अनारी गावात झालेल्या ढगफुटीचे अनारी गावात नुकसान झालेले नाही. गावातील रस्तादुरुस्तीचे काम सचिन पाकळे या ठेकेदाराने घेतले आहे. त्यांच्याकडून पोट ठेकेदाराची नियुक्त आहे. त्यामुळे ठेकेदाराचे किती नुकसान झाले, हे निश्चित सांगता येत नाही.

-डी. बी. रुघे, तलाठी अनारी. ता. चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()