पाली - अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली मध्ये बुधवारी (ता. 25) सायंकाळी तुफान पाऊस पडला. या पावसामुळे येथील खडकआळी व प्रबुद्ध नगर जवळील घरांमध्ये पाणी शिरले. पालीत पडलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
ढगफुटी सारखा पावसामुळे येथील नाले प्रचंड भरले आणि नाल्यातून बाहेर रस्त्यावर पाणी वाहू लागले. येथील रहिवाशी राजेश रुईकर, अविनाश शिंदे, गणेश शिंदे व संजय सागळे आदींच्या घरात व ओटीवर पाणी आले होते. त्यामुळे या लोकांची मोठी गैरसोय झाली.
अतिशय कमी वेळात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आणि या पाण्याचा वेग देखील प्रचंड होता. यामुळे येथील रस्त्यावरून पादचारी व वाहनांना जाण्यायेण्यास अडचणी येत होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.