तळेरे (सिंधुदुर्ग) - परतीच्या पावसामुळे आज पुन्हा शेतकरी व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कासार्डे व नांदगाव परिसरात ठिकठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर सर्व्हीस रोडवर पाणी साचून सेवा रस्त्याला ओहोळाचे स्वरुप आले होते. कासार्डे पोलीस आऊट पोस्टच्या सभोवताली पाणी साचले. कापणी केलेल्या भाताचे मोठे नुकसान झाले.
गेली काही दिवस पावसाचे सावट असल्याने नांदगाव व कासार्डे परिसरात नागरिकांची दमछाक होत होती; मात्र पावसाचे ढग दाटून यायचे मात्र पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस थांबेल, की नाही आशी स्थिती असताना रविवारी पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गासह नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.
काही ठिकाणी भातकापणी केली होती ते भात भिजून चिंब होतेय ते शेतकऱ्यांना उभ्या डोळयांनी पाहावे लागले; मात्र त्यातही धीर न सोडता कापलेले भात घरी आणण्यासाठी आटापिटा सुरू असतानाचे चित्र दिसत होते. नांदगाव, तळेरे, कासार्डे भागात सर्व्हीस रोडचे रूपांतर ओहोळात झाले होते. कासार्डे येथील तांबळवाडी व देऊलकरवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या ओहोळावरील पुलावरून पाणी गेल्याने संपर्क तुटला होता. महापुरूष देवस्थान येथही पाणी आले होते.
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.