रत्नागिरी बनणार नावीन्यपूर्ण पर्यटन शहर; जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडून पाहणी

Higher and Technical Education Minister Uday Samant has said that Ratnagiri will be an innovative tourist city
Higher and Technical Education Minister Uday Samant has said that Ratnagiri will be an innovative tourist city
Updated on

रत्नागिरी :  जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्याने रत्नागिरी नावीन्यपूर्ण पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी शहराचे प्रवेशद्वार साळवी स्टॉप ते मांडवी किनारा या भागातील विविध ठिकाणांची पाहणी जे. जे. स्कूलच्या पथकाकडून केली. यासाठी शासनाकडून एक कोटी आणि पालिकेकडून निधी मंजूर केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरी शहराच्या सुरवातीपासून ते मांडवी किनाऱ्यापर्यंत शहरातील प्रत्येक ठिकाणाला वेगळा लूक असावा, यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्याने काम केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली गेली. शहरातील मारुती मंदिर सर्कलसाठी १ कोटी रुपये, साळवी स्टॉप येथील कमानीसाठी ३० ते ३५ लाख रुपये निधी मंजूर आहेत. 

स्वा. सावरकर चौक, डॉ. आंबेडकर पुतळा, जयस्तंभ येथील चौकांच्या सुशोभीकरणासाठी यंत्रणा राबत आहे. यातून रत्नागिरी शहराला पर्यटनाचा नवा साज दिला जाईल. पर्यटन विभागासह जिल्हा नियोजनमधून हा निधी मिळणार आहे. तसेच मांडवी, भाट्ये बीचवर जे. जे. स्कूलच्या बेस्ट मटेरिअलमधून कायमस्वरूपी सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थी काम करत आहेत. शहरातील थिबा पॅलेसमध्ये मे महिन्यात म्युझियम सुरू होईल. जे. जे. स्कूलतर्फे मुंबईत भरवण्यात येणाऱ्या म्युझियममध्ये ज्या प्रतिकृती ठेवल्या जातात, त्या थिबा पॅलेसमध्ये पाहायला मिळणार आहेत. कोविडनंतर निधीची कमतरता पडणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानुसार ही कामे सुरू आहेत. रत्नागिरी महाराष्ट्रातील नामवंत शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कुलगुरूंचे राजीनामे वैयक्तिक कारणास्तव : सामंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍निकल इन्स्टिट्यूट लोणेरे आणि जळगाव येथील विद्यापीठाच्या दोन कुलगुरुंनी दिलेल्या राजीनाम्याविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. त्या दोघांनीही वैयक्‍तिक कारणामुळे राजीनामे दिले आहेत. त्याला राजकीय हस्तक्षेप जबाबदार नाही, याची खात्री केली आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी पुराव्यासह केले पाहिजेत, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.