रत्नागिरीतून पळून जाण्यासाठी दोघांच्या नावाची गाडी सजवून रेल्वे स्थानकात उभी आहे, असेही तिला सांगण्यात आले होते.
रत्नागिरी : ‘डीपी’ला वेगळाच फोटो, चॅटिंग करणारा एक आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी फोनवर बोलणारा दुसराच. अशा प्रकारे सोशल मीडियावरील (Social Media) ओळखीचे प्रेमात रुपांतर होत असताना चंदीगड-पंजाबमधील (Chandigarh Punjab) तरुणीला फसवून थेट रत्नागिरीत आणले गेले. परंतु इथे आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर एका संशयितावर गुन्हा दाखल झाला.