दुष्काळामुळे शेकडो नौका हर्णै, आंजर्ले किनाऱ्यावर

फास्टर नौकांचा त्रास ; समुद्राची पूजा करून घातले साकडे
Drought
Droughtsakal
Updated on

हर्णै : समुद्रामध्ये उद्भवलेल्या मासळी दुष्काळामुळे(Drought) २० ते २५ दिवस बहुतांशी नौका हर्णै बंदरात आणि आंजर्ले खाडीत नांगर टाकून आहेत. मासेमारीला (Fishing)गेलेल्या काही मच्छीमारांना हात हलवत परत यावे लागले आहे. यामुळे मच्छीमार निराश झाले आहे. मासळी मिळण्यासाठी हर्णै बंदरात सालाबादप्रमाणे मच्छीमारांनी समुद्राची पूजा करून मासळीसाठी देवाकडे साकडे घातले.

Drought
सोलापूर : वाणानुसार ठरले द्राक्षाचे दर!

मासळी हंगामाच्या सुरवातीपासूनच अनेक छोट्या-मोठ्या वादळांमुळे मासेमारी संकटात सापडली आहे. ऑक्टोबरपासून मासळी चांगल्याप्रकारे मिळू लागली होती. गेले दोन महिने मासळीची आवक चांगली होती. परंतु गेले महिनाभर परराज्यातील फास्टर इंजिनच्या नौकांनी हर्णै परिसरातील समुद्रात धुमाकूळ घातला आहे. वेळेला करोडो रुपयांची मासळी एक नौका नेत आहे. रोजच्या १०० ते २०० नौका या भागात असतात. त्यामुळे गेले २० ते २५ दिवस मासळीच मिळत नाही. त्यामुळे आता दुष्काळाचे संकट येऊन ठेपले आहे. वातावरणात अचानक होणारे बदल, केरळ, कर्नाटक आणि गुजरातच्या फास्टर इंजिन असलेल्या नौकांचे अतिक्रमणामुळे पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बंदरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी होणारा लिलाव थंडावला आहे.

Drought
वाकड : १४४ वाहनांना १ लाख ३५ हजार दंड आकारला

रोजचा होणारा सर्व खर्च नौकामालकाच्या अंगावर पडत आहे. ट्रॉलर मासेमारीसाठी १० ते १२ दिवसांसाठी जातात. दोन सिलेंडरच्या नौका या ५ ते ६ दिवसांसाठी जातात. सध्या मिळणाऱ्या मासळीतून डिझेल खर्चही सुटत नाही. त्यामुळे सध्या मच्छीमार मासेमारीला जाण्यास धजावत नाहीत. किमान १५० ते २०० नौका हर्णै बंदरात उभ्या आहेत. उर्वरित २०० ते ३०० नौका आंजर्ले खाडीत अजूनही शाकारलेल्या अवस्थेत आहेत.(Kokan news)

Drought
नवी मुंबई : Containment Zone संदर्भात नवीन नियमावली, जाणून घ्या

मासळी बऱ्यापैकी मिळावी म्हणून मच्छीमारांनी सालाबादप्रमाणे समुद्राची पूजा करून सत्यनारायणाची पूजा केली. मच्छीमारांवर येणारी संकट दूर करण्यासाठी आणि वातावरण शांत होऊन मासळी मिळण्यासाठी प्रार्थना केली. सध्या फास्टर नौकांचा धुमाकूळ थांबणे गरजेचे आहे. तरच आम्हा मच्छीमारांना आमच्या बंदरात मासळी मिळेल. त्यासाठीच परमेश्वराकडे याचना केली आहे, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.

फास्टर नौकांनी धुमाकूळ घातला आहे. आमच्या बंदरासमोरच समुद्रात या नौका मोठ्या संख्येने मासेमारी करतात. सरकारने याविरोधात कायदा करूनही काहीच फायदा नाही. कारण त्याची अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे आता प्रचंड मासळी दुष्काळ जाणवू लागला आहे. अजूनही डिझेल परतावा मिळत नाही. सरकारने आमच्याकडे कधीतरी लक्ष द्यावे हीच प्रामाणिक अपेक्षा आहे.

-बाळकृष्ण पावसे, कार्याध्यक्ष, दापोली, मंडणगड, गुहागर मच्छीमार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.