US Woman Found Chained: स्वत:लाच घेतलं होतं बांधून...जंगलात आढळलेल्या अमेरिकी महिलेबाबत धक्कादायक खुलासा

US Woman found chained to tree in forest: महिलेने सुरुवातीला पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये पतीने आपल्याला साखळीने बांधल्याचा दावा केला होता. पण, आता महिलेने वेगळाच दावा केला आहे.
US Woman found chained to tree
US Woman found chained to tree
Updated on

मुंबई- कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक महिला साखळ्यांनी झाडाला बांधून ठेवल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. कारण, हा धक्कादायक प्रकार होता. महिलेने सुरुवातीला पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये पतीने आपल्याला साखळीने बांधल्याचा दावा केला होता. पण, आता महिलेने वेगळाच दावा केला आहे.

महिलेने पोलिसांना सांगितलंय की, तिनेच स्वत:ला साखळीमध्ये बांधून घेतलं होतं. यामध्ये दुसऱ्या कोणाचा हात नाही. पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महिला ५० वर्षांची आहे. महिलेची मानसिक स्थिती ठीक नाही त्यामुळे तिने स्वत:ला कष्ट दिले असं अधिकारी सांगत आहेत. 'लाईव्ह हिदूस्तान'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

US Woman found chained to tree
Konkan Food : तळकोकणातली सकाळ आजही उकड्या तांदळाच्या पेजेनंच होते; सफर कोकणची खाद्यसंस्कृतीची..!

मानसिक अनारोग्यामुळे महिलेला अनेक समस्या जाणवत आहेत. जंगलामध्ये महिला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. २७ जुलै रोजी एका व्यक्तीने महिलेचा ओरड्याचा आवाज ऐकला अन् हे प्रकरण समोर आलं. महिलेला झाडाला बांधण्यात आलं होतं अन् ती अशक्त झाली होती. यानंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. पोलिसांनी महिलेचा जबाब घेत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

महिला तीन कुलूप आणि लोखंडाची एक साखळी घेऊन जंगलात गेली होती. यातील एका कुलूपाने आणि साखळीने तिने स्वत:ला बांधून घेतले. सोनुरली गावातील जंगलाजवळ तिने स्वत:ला बांधून घेतले होते. तिच्याकडे अमेरिकी पासपोर्टचे झेरॉक्स आणि तामिळनाडूचा पत्ता असलेले आधारकार्ड आढळून आले होते. महिलेकडील व्हिसाची मुदत संपली होती. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

US Woman found chained to tree
Mumbai Dadar Crime: रक्ताचे डाग असलेली बॅग घेऊन दादर स्टेशनवर फिरत होता; पोलिसांनी तपासलं अन् धक्काच बसला

महिलेने आता पोलिसांना वेगळीच माहिती दिली आहे. तिने सांगितलंय की, तिचा कोणीही पती नाही. महिलेची आई अमेरिकेमध्ये राहते. पण, आतापर्यंत तिच्या कुटुंबातून कोणीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. महिला किती दिवस जंगलामध्ये बांधलेल्या अवस्थेत होती हा प्रश्न कायम आहे. महिला जेव्हा आढळून आली तेव्हा ती मरण अवस्थेत होती, त्यामुळे काही दिवस तिथे ती होती असं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.