Raigad News : पाणीपट्टी न भरल्‍यास पुरवठा खंडित; महाड नगरपालिकेचा नागरिकांना दवंडी पिटून इशारा

नगरपालिकेचा मालमत्ता तसेच पाणीपट्टी कर ५ फेब्रुवारी पूर्वी न भरल्यास तसेच पाण्याच्या नळाला कॉक न लावल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा महाड नगरपालिकेने नागरिकांना दिला आहे.
if water bill unpaid cut off water supply warning of mahad municipality raigad
if water bill unpaid cut off water supply warning of mahad municipality raigadSakal
Updated on

Mahad News : नगरपालिकेचा मालमत्ता तसेच पाणीपट्टी कर ५ फेब्रुवारी पूर्वी न भरल्यास तसेच पाण्याच्या नळाला कॉक न लावल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा महाड नगरपालिकेने नागरिकांना दिला आहे. शहरातून गेल्‍या काही दिवसांपासून अशा प्रकारची दवंडी पालिका प्रशासनाकडून फिरवण्यात येत आहे.

महाड नगरपालिकेला मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, भुईभाडे व गाळे भाडे अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर जमा होतो. उत्पन्नाचा मुख्य स्रोत हेच असल्‍याने दरवर्षी नगरपालिका करवसुलीवर मोठ्या प्रमाणात भर देते. तरीही अनेक नागरिक मालमत्ता व पाणीपट्टी कर वेळेत भरत नसल्‍याने थकबाकी वाढते. नगरपालिकेने थकीत कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी वसूल करत आहेत.

महाड नगरपालिकेने वसुली मोहीम गांभीर्याने घेतली असून शहरांमध्ये दवंडी पिटवण्यात आली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, भुई भाडे व गाळे भाडे याची रक्कम ५ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांनी भरावी, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच रक्कम वेळेत न भरणाऱ्या नागरिकांचा महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमान्वये पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कॉक नसल्‍यास कारवाई

नळ चालू-बंद करण्यासाठी असलेला कॉक अनेक ठिकाणी काढलेले दिसतात. त्‍यामुळे पालिकेचे पाणी आल्यानंतर सतत वाहत राहते व मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. यामुळे नागरिकांनी नळांना कॉक बसवावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. कॉक नसलेले नळ दिसल्‍यास संबंधित नागरिकांचा पाणीपुरवठा तत्काळ खंडित केला जाईल, असा इशारा नगरपालिकेने दिलाआहे.

उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्‍न सुरू आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी, भुई भाडे व गाळे भाडे हे पालिकेच्या उत्‍पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. त्‍यामुळे नागरिकांनी आपले कर त्वरित भरून पुढील कार्यवाही टाळावी.

- धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी, महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.