दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

pali
pali
Updated on

पाली - पाली पासून काही अंतरावर असलेल्या झाप गावातील उत्कर्ष नगर (बौध्दवाडीतील) मधील ग्रामस्तांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील नळांना पुरेसे पाणी येत नसल्याने झाप बौध्दवाडीकरीता पाणी साठवण टाकी मधून नवीन पाईपलाईनची जोडणी करुन स्वतंत्ररित्या पाणीपुरवठा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन या ग्रामस्तांनी गुरुवारी (ता.4) पाली सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांना दिले. 

या निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, पाली ग्रामपंचायतीचे प्रशासक महेश घबाडी यांना देखील दिले. येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उत्कर्षनगर बौध्दवाडीतील संतप्त महिला व ग्रामस्तांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

झाप ग्रामस्तांना पिण्याच्या पाण्यासह रस्ते, विज, व सांडपाणी निचरा आदी समस्यांनी ग्रासले आहे. याबाबत पाली ग्रामपंचायतीसह प्रशासनाकडे वारंवार तक्रारी अर्ज देउनही या गंभीर समस्यकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्तांनी केला आहे. यावेळी मनोहर गायकवाड, चंद्रसेन भालेराव, मारुती भालेराव, श्रेयश भालेराव, चंद्रगुप्त भालेराव, भाउ भालेराव, श्रेयश भालेराव, ग्रा.पं. सदस्य अजय मुळे, सुधीर भालेराव, प्रविण भालेराव, संदीप गायकवाड, मनिषा गायकवाड, संगिता भालेराव, माधुरी भालेराव, चंद्रकला भालेराव, रुक्मीनी भालेराव, रसिका गायकवाड, माया भालेराव, आदिंसह झाप उत्कर्षनगर बौध्दवाडीतील ग्रामस्त उपस्थीत होते. 

झाप गावात दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत 4 लाख 98 हजार निधी खर्चुन 20 हजार लिटर पाणीसाठा मर्यादा असलेली पाण्याची टाकी मागील पाच ते सहा वर्षापुर्वी बांधण्यात आली आहे. परंतू या पाण्याच्या टाकीचा वापर उत्कर्षनगर बौध्दवाडी यांच्याव्यतीरिक्त संपुर्ण गावासाठी करण्यात येत आहे. परिणामी बौध्दवाडीतील उंचवट्यावर असलेल्या भागाला पुरेसे पाणी मिळत नसून सखोल भागातील वस्तीला नळातून पाणी निघून जात असल्याने बौध्दवाडीतील ग्रामस्तांना पाणी अपुरे पडत आहे. येथील नळाला तसेच स्टॅन्ड पोलला देखील पाणी येत नाही. ही समस्या मार्गी लावण्यासाठी पाण्याच्या टाकीवरुन बौध्दवाडीला स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी ग्रामस्तांनी केली आहे.  

झाप उत्कर्षनगर ग्रामस्तांनी दिलेल्या निवदेनाची तत्काळ दखल घेवून गटविकास अधिकारी पाली सुधागड व पाली ग्रामपंचायतीला याबाबत योग्य व जलद कार्यवाही करण्याबाबतचे पत्र दिले जाईल. 
बि.एन. निंबाळकर, तहसिलदार, पाली-सुधागड 

झाप उत्कर्षनगर बौध्दवाडीतील ग्रामस्तांनी टाकीत पाणीपुरवठा होत नसून नळाला पाणी येत नसल्याचे तक्रारी निवेदन दिले आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमार्फत नळजोडणी व पाणी साठवण टाकीची पुर्णता पाहणी करुन नवीन बायपास पाईपलाईनची जोडणी करुन दिली जाईल. 
महेश घबाडी, प्रशासक, पाली ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()