मात्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सदर बांधकाम अनधिकृत असून ते सीआरझेडमध्ये येत असल्याची तक्रार केली होती.
दाभोळ : दापोली तालुक्यातील मुरुड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे सचिव मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांनी बांधलेला बंगला त्यांनी स्वत:च तोडण्यास सुरवात केली आहे. नार्वेकर यांनी मुरुड येथे जागा विकत घेऊन येथे पूर्वीचे असलेले घर पाडून नवीन बंगला बांधण्याचे काम सुरु केले होते. मात्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी सदर बांधकाम अनधिकृत असून ते सीआरझेडमध्ये येत असल्याची तक्रार केली होती. या बंगल्याची पाहणी केंद्रीय पर्यावरण विभागाचे अधिकाऱ्यांकडूनही झाली आहे. (konkan Update)
मात्र आता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे मुरुड येथे सीआरझेडमधील अनधिकृत बंगल्याचे बांधकाम त्यांना तोडावे लागेल असे म्हणत बांधकाम तोडतानाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. आता पुढचा नंबर अनिल परब (anil parab) यांच्या रिसॉर्टचा असल्याचेही त्यांनी म्हटंले आहे. उद्या मी स्वत: मुरुड येथे जाणार असून मिलिंद नार्वेकर यांच्या उध्वस्त केलेल्या बंगल्याची पाहणी करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटंले आहे.
सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांनी विकलेल्या जागेत साई रिसॉर्ट बाबतही तक्रार केली असून हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेडचे नियमांचे उल्लघंन केल्याचे म्हटंले आहे. या बांधकामाबद्दल त्यांनी हरित लवादात दावा दाखल केले आहे. दरम्यान मिलिंद नार्वेकर यांच्या बांधकामाची चौकशी सुरु असून त्यांना अद्याप महसूल प्रशासनाने बांधकाम पाडून टाकण्याची कोणतीही नोटीस दिली नसताना स्वत:हून बंगल्याचे बांधकाम पाडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या बांधकामासाठी मिलिंद नार्वेकर यांनी ५० लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असल्याची चर्चा मुरुड येथे सुरू आहे. मात्र आता बांधकाम तोडले जात आहे. यानंतरच्या बांधकामासाठी शासनाच्या विविध खात्यांकडून रीतसर बांधकाम परवानगी घेण्यात येणार असून ही परवानगी मिळाल्यानंतर नवे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती मिलिंद नार्वेकर यांचे मुरुड येथील स्थानिक प्रतिनिधींना दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.