रत्नागिरीमध्ये आघाडीबाबत शिवसेनेकडून तळ्यात-मळ्यात

आघाडी झाल्यास शिवसेनेच्या जागा कमी होणार
Shivsena
ShivsenaShivsena
Updated on
Summary

आघाडी झाल्यास शिवसेनेच्या जागा कमी होणार

रत्नागिरी : पालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत(ratnagiri) आघाडीचा निर्णय घेण्यासाठी शिवसेनेने कोअर कमिटीची(shivsena core committee ) स्थापना केली आहे. ही कमिटी निवडणुकीत आघाडी करण्याबाबत आपला निर्णय पक्षाला कळवणार आहे; मात्र शहरात शिवसेनेचे प्राबल्य कायम असून इच्छुकांची भाऊगर्दी आहे. यात आघाडी केल्यास सेनेच्या जागा कमी होणार असून, पक्षातील इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. त्यांच्या नाराजीचा परिणाम निवडणुकीवर होणार, हे निश्चित असल्याने सेनेकडून आघाडीबाबत अजूनही तळ्यातमळ्यात आहे.

पालिकेच्या निवडणुकांची(election) हालचाल सुरू आहे. गेले वर्षभर त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत; मात्र कोरोना(corona) महामारीमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आजपासून रत्नागिरी पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. फेर प्रभागरचना होऊन १६ प्रभाग ३२ सदस्य होणार आहेत. आघाडीचा धर्म पाळून राज्यात निवडणुका लढण्याच्या दृष्टीने सुतोवाच असले तरी प्रत्येक जिल्हा आणि शहरांमधील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्या परिस्थितीनुसार आघाडी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Shivsena
सोलापूर : नऊ नगरपरिषदांवर प्रशासकाची नियुक्ती

निर्णय पक्षाला कळवणार

रत्नागिरीत सेनेने स्थापना केलेल्या कोअर कमिटीमध्ये जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी,शहरप्रमुख बिपिन बंदरकर, गटनेते राजन शेट्ये यांचा समावेश आहे. ही कमिटी आघाडीबाबत आपला निर्णय पक्षाला कळवणार आहे.

Shivsena
कालीचरण यांच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

पक्षविरोधात काम होण्याची शक्यता

रत्नागिरी शहरातील १५ प्रभागांपैकी १ ते ७ प्रभागांमध्ये शिवसेना आहे तर उर्वरित प्रभागांमध्ये शिवसेनेला चांगले वातावरण आहे. त्यात शहरामध्ये सेनेची ताकद असल्याने इच्छुकांची संख्यादेखील मोठी आहे. आघाडी झाल्यास शिवसेनेच्या जागा कमी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची नाराजी वाढून पक्षविरोधात काम होण्याची शक्यता आहे. आघाडीला अनेकांचा नकार आहे. तरी कमिटी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.