सिंधुदुर्गात कोरोनाचा कहर; रुग्ण वाढले तरी वैद्यकीय सज्जतेत होतेय सुधारणा

मुंबईवरून जिल्ह्यात दाखल झालेल्या एका चाकरमान्याच्या रूपाने पहिला रुग्ण मिळाला.
Sindhudurg Corona News Updates
Sindhudurg Corona News Updatessakal
Updated on

सिंधुदुर्ग : २०२० या कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी या पहिल्याच महिन्यात पूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरस या विषाणूने देशात शिरकाव केला. सिंधुदुर्गात २६ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण मिळाला. मुंबईवरून जिल्ह्यात दाखल झालेल्या एका चाकरमान्याच्या रूपाने पहिला रुग्ण मिळाला. दुसरा रुग्ण २९ एप्रिल २०२० रोजी मिळाला. मे महिन्यापासून पुढे रुग्ण मिळत गेले. सलग २३ महिने आपण या जागतिक आपत्तीशी झुंज देत आहोत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. किती दिवस चालणार याची स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे अजून काय काय गमवावे लागणार ? याची भीती सतावत आहे. मात्र, या कोरोनाने जिल्ह्यातील आरोग्य सुविधेचे धिंडवडे काढले. मर्यादा स्पष्ट केल्या. आमचे शासन आरोग्य व शिक्षण याची जबाबदारी घेते, हे आम्ही अभिमानाने सांगत होतो. ते किती भंपक आहे, हे स्पष्ट झाले. (Sindhudurg Corona News Updates)

Sindhudurg Corona News Updates
रायगड जिल्ह्यातील पक्षी निरीक्षण क्षेत्रं बहरली

काय आहे सद्यस्थिती

गेल्या २३ महिन्यांत एकाच शत्रूशी आपली लढाई सुरू आहे. नागरिकांनी मास्क लावत, गर्दीत जाण्याचे टाळत व हात स्वच्छ धुवत सहकार्य केल्याने दोन लाटा आपण परतवून लावल्या आहेत. आता तिसरी लाट सुरू झाली आहे. ही तिसरी लाट पहिल्या व दुसऱ्या लाटेसारखी गंभीर परिणामकारक अद्याप दिसलेली नसली तरी कोरोनाबाधितांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा जास्त व दुसऱ्या लाटेत मिळणाऱ्या बाधित संख्येच्या बरोबर आहे. या लाटेत कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे; पण गंभीर लक्षणे तुलनेने खूपच कमी दिसत आहेत. त्यामुळे त्याची दहशत अद्याप जाणवत नाही. परंतु दहशत नाहीच, असे म्हणता येणार नाही, कारण आजच्या घडीला सुद्धा सरासरी ६० च्या आसपास शासकीय संस्थेत रुग्ण उपचार घेत आहेत. २० च्या आसपास ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरवर रुग्ण उपचार घेत आहेत. याचा अर्थ काही व्यक्तींना या लाटेचा गंभीर त्रास होत आहे, हे नक्की! (Sindhudurg Corona News Updates)

पहिल्या लाटेत तारांबळ

मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा कोरोना अनुषंगिक यंत्रणा उभी करण्यासाठी पुढे आली. त्यावेळी आयसीयू बेड मोजके होते. व्हेंटिलेटरची तर दयनीय अवस्था होती. ऑक्सिजन सिलिंडरचा तर थांगपत्ता नव्हता. कोल्हापूर व गोवा यांच्यावर अवलंबून रहावे लागत होते. कोरोना तपासणी लॅब नव्हती. सुरुवातीला पुणे, नंतर मिरज व कोल्हापूर येथील चाचणी केंद्रात तपासणी होत होती. जून २०२१ मध्ये जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याची तपासणी लॅब सुरू झाली.

Sindhudurg Corona News Updates
Political News: बंडखोरी महाआघाडीसाठी धोक्याची घंटा

कसा दिसला प्रभाव?

एवढी यंत्रणा उपलब्ध असतानाही सर्व यंत्रणा एप्रिल २०२१ या एका महिन्यात कमी पडली. एवढी दहशत कोरोनाने या महिन्यात माजविली. एका महिन्यात ५ हजार ३५० एवढे विक्रमी रुग्ण मिळाले आहेत. ७ हजार १२२ वर ३१ मार्च रोजी असलेली एकूण बाधित संख्या १२ हजार ४७२ वर पोचली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. ३१ मार्च रोजी ६ हजार ४९९ रुग्ण कोरोनामुक्त होते. आता यात ३ हजार ५२८ एवढी वाढ झाल्याने एकूण कोरोनामुक्त संख्या १० हजार २७ झाली आहे. गेल्या ३१ दिवसांत १४३ बळी गेले आहेत. ३१ मार्चला १८३ वर असलेली कोरोना मृत्यू संख्या ३२६ झाली आहे. ३१ मार्च रोजी ४३४ सक्रिय रुग्ण संख्या होती. एप्रिल महिन्यात ही संख्या ३ हजारांवर गेली होती. ३० एप्रिल रोजी २ हजार ११३ रुग्ण सक्रिय आहेत. विशेष म्हणजे एका महिन्यात कोरोना टेस्ट लाखाच्या जवळ पोचली आहे. ३१ मार्च रोजी ही संख्या ७२ हजार ३२२ होती. आता ती ९९ हजार ५६६ झाली आहे. तब्बल २७ हजार २४४ टेस्ट करण्यात आल्या आहेत.

Sindhudurg Corona News Updates
अकोला : खरीपात ७३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन!

लसीकरणामुळे दिलासा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तिसरी लाट सुरू आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सध्या रुग्ण मिळत आहेत. सरासरी दिवसाला २०० रुग्ण मिळत आहेत. मात्र, यातील ९५ टक्के पेक्षा जास्त रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. कारण त्यांना सौम्य लक्षणे आहेत. सौम्य लक्षणे असण्यामागे जिल्ह्यातील ९७ टक्के नागरिकांनी घेतलेली पहिली लस हे कारण आहे.

वैद्यकीय सज्जता

ऑक्सिजनचे ६ प्लांट तयार आहेत. दोन तयार होत आहेत. जिल्हा रुग्णालयात दोन प्लांट सुरू असून एक तयार होत आहे. कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले येथे प्रत्येकी एक प्लांट आहे. सावंतवाडी येथे दोन प्लांट तयार होत आहेत. १३ टन ऑक्सिजन निर्मिती आपल्याकडे होत आहे. रिफलिंग प्लांट सुद्धा आहे. जीरा सिलिंडर सुद्धा उपलब्ध असून १३७४ जंबो सिलिंडर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात १३८० बेड उपलब्ध करण्याचे आदेश असताना १९०० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ९८४ बेड असून त्यात ८०० ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. तर कोविड केअर सेंटरमध्ये ९१७ बेडउपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.