राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची पाहणी केल्यानंतर नौदल अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय येथे मंत्री दीपक केसरकर यांच्याशी एकंदरीत परिस्थिती बाबत बंद दाराआड चर्चा केली.
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर (Chhatrapati Shivaji Maharaj Collapse Statue) सरकारसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. हा पुतळा उभारण्यात भारतीय नौदलाने (Indian Navy) पुढाकार घेतला असल्या कारणाने नौदलाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान, आज सकाळी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी राजकोट येथे येत कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली.