पारंपारिक बागांमध्ये एकात्मिक किटक व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष 

Integrated Pest Management Ignored In Traditional Gardens
Integrated Pest Management Ignored In Traditional Gardens
Updated on

गुहागर ( रत्नागिरी ) - हापुस आंब्यांची नवीन बाग लावताना तंत्रज्ञानाचा वापरही केला पाहिजे. पारंपरिक बागांमधुनही अधिक उत्पन्न घेण्यासाठी एकात्मिक किटक व्यवस्थापनाचा (इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट) आधार घेणे फायद्याचे ठरते. नियोजनबद्ध व वातावरणातील बदलानुसार फवारणी, मृदा परिक्षण, जैविक खतांचा वापर आधी भाग या व्यवस्थापनात असतात. परंतु बागायतदार त्याकडे गांभिर्याने पाहात नाहीत. 

एकात्मिक किटक व्यवस्थापनाविषयी मिलिंद गाडगीळ "सकाळ'शी बोलताना म्हणाले, अनेक बागायतदार दुसऱ्यांचे पाहून खतांचा वापर करतात. आपल्या बागेतील मातीमध्ये कोणते घटक कमी आहेत याची माहिती घेवून खते घातली तर त्याचा झाडाला फायदा होईल. आज बाजारपेठेत रासायनिक खतांबरोबर जैविक आणि सेंद्रीय खते उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणत्याही खतांच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो, उत्पादनाची गुणवत्ता वाढते. खते घातल्यावर झाडाला पुरेसे पाणी मिळण्यासाठी देखील त्या बागेची तज्ज्ञांकडून पाहाणी करून मगच जल व्यवस्थापन केले पाहिजे. 

मनुष्यापेक्षा किटकांचे गंध ज्ञान प्रभावी आहे. बागेत फवारणी करता उघडलेल्या औषधाचा वास त्यांच्यापर्यंत पोचतो. तापमान वाढू लागले की किटक पानाच्या मागच्या बाजूला मध्यभागी बसतात. तुम्ही कितीही फवारणी केलीत तरी फायदा होत नाही. त्याऐवजी फवारणी सूर्योदय आणि सूर्यास्ताचे वेळी झाली तर त्याचा परिणाम अधिक होतो. आज प्रत्येकाकडे असलेल्या स्मार्ट फोनवर पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज मिळतो. हा अंदाज घेऊन फवारणीसाठी कीडनाशके निवडली तर चांगला परिणाम पाहायला मिळेल.

फवारणीसाठी ब्रॅण्डेड कीडनाशकाऐवजी जेनरिक औषधांचा वापर केल्यास खर्च कमी येतो. चिकट सापळे, फळमाशीसाठी कामगंध सापळे, किटकांना आकर्षित करणारा सोलर लाईट आदी रक्षक सापळे आज बाजारात सहज आणि कमी दरात उपलब्ध असतात. पण बागायतदार त्याकडे दुर्लक्ष करतात. विस्तारलेली आणि वय झालेली झाडांची छाटणी करण्यासाठी शासनाच्या योजनामध्ये सहभागी झाल्यास आपल्याला काही प्रमाणात नुकसानभरपाई मिळते. अशा कलमांची संख्या जास्त असेल तर योजना नसतानाही तालुका कृषी विभागाकडे प्रस्ताव देवू शकतो. 

कार्यशाळांमध्ये जाण्याकडे पाठ 

दरवर्षी आंबा हंगामापूर्वी तालुका कृषी कार्यालय, कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत आंबा बागायदारांच्या कार्यशाळा घेतल्या जातात. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाबरोबरच एकात्मिक किटक व्यवस्थापनाविषयी माहिती दिली जाते. अशा कार्यशाळांमध्ये जाऊन आपल्या बागेविषयी अधिकचा सल्ला आपण मागू शकतो. परंतु सरकारी काम संथ गतीने होत असल्याने या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्याऐवजी बागायदार दुसऱ्या बागायतदाराकडून सल्ला घेवून, त्यात आपले ठोकताळ्यांनुसार बदल करून प्रयोग करतात. हे प्रयोग उत्पादन आणि खर्चाचे गणित बिघडवतात, याकडे गाडगीळ यांनी लक्ष वेधले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.