NDRFनं वापरलेला 'गोल्डन अवर'चा नियम काय? ज्यामुळं इर्शाळवाडीत वाचले शेकडो जणांचे प्राण

एनडीआरएफच्या डेप्युटी कमांडंट यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
NDRF
NDRF
Updated on

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथं तीन दिवसांपूर्वी दरड कोसळून संपूर्ण गावच गाडलं गेल्याची भीषण घटना घडली. मुसळधार पाऊस आणि रात्री उशीरा घडलेल्या या घटनेमुळं अनेक जण दगावण्याची भीती होती. पण या घटनेत आत्तापर्यंत दीडशेहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. हे गोल्डन अवर तत्वामुळं शक्य झालं आहे. हे नेमकं काय आहे? हे NDRFचे डेप्युटी कमांडंट प्रमोद कुमार सिंह यांनी सांगितलं आहे. (Irshalwadi Landslide What is golden hour rule used by NDRF hundreds of lives were saved)

NDRF
Manipur Violence: मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया; म्हणाले, PM मोदींनी दखल...

इर्शाळवाडी इथं आजचं बचाव कार्य थांबवण्यात आलं असलं तरी ते पुढेही चालू राहणार आहे, अशी माहिती प्रमोद कुमार यांनी दिली. त्यांनी म्हटलं की, "गेल्या तीन दिवसापासून एनडीआरएफ सातत्यानं काम करत आहे. तुम्ही माहिती आहेच की तीन दिवसांपूर्वी रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Latest Marathi News)

रात्र झालेली असल्यानं अनेक लोक आपल्या घरात झोपले होते, त्यामुळं अशा घटनेबाबत ते अलर्ट होऊ शकले नाहीत, त्यामुळं जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे" काही लोक सांगतात की, काही मुलं गावाच्या शाळेच्या ग्राऊंडमध्ये मोबाईल पाहत बसले होते ते या दुर्घटनेतून वाचले आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना याची पहिल्यांदा माहिती दिली. यानंतर जेव्हा एनडीआरएफला याची खबर मिळाली तेव्हा लगेचच आमच्या टीमनं दुर्घटनास्थळी कूच केली. (Marathi Tajya Batmya)

बचाव मोहिम मोठं आव्हान होतं

यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की, गेल्या तीन दिवसांपासून वातावरण खूपच प्रतिकूल होतं. कारण दुर्घटना घडली ते ठिकाण पायथ्यापासून साडे नऊशे मीटर इतकी आहे. तसेच २.३ किमीचा हा पूर्ण रस्ता आहे.

सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं हा मार्ग अधिकच बिकट बनला आहे. या ठिकाणी वजनदार उपकरण घेऊन जाऊ शकत नव्हतो, ते एक मोठं चॅलेंज होतं. कारण सर्व काम मॅन्युअली करायचं होतं. यामध्ये कटिंग उपकरणं, खोदाईची उपकरणं अशी अवजड उपकरणं यामध्ये वापरण्यात आली.

NDRF
Rain Update: पुढील 5 दिवसात पावसाची स्थिती कशी असेल? हवामान खात्यानं दिला 'हा' इशारा

१५ फुटांचा मातीचा ढिगारा

एनडीआरएफच्या दृष्टीकोनातून सांगायचं झाल्यास आम्ही आत्तापर्यंत २६ मृतदेह बाहेर काढले आहेत. ही दरड खूपच मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे. एका ठिकाणी तर केवळ १५ फुटाचा मातीचा ढिगारा पडला होता. आमच्याकडं श्वान पथक देखली आहे. पण इतक्या खोलातून श्वानांना कुठला वास येणं हे कठीण आहे.

NDRF
Irshalwadi Landslide: "इर्शाळवाडीतील मृतांची संख्या तीन आकडी असू शकते"; गिरीश महाजन सांगितला ग्राऊंड रिपोर्ट

गोल्डन अवरमुळं वाचले अनेकांचे प्राण

पण यामध्ये एक गोल्डन अवरचं तत्व काम करतं. यामध्ये एखाद्या घटनेनंतर तुम्ही जेवढ्या लवकरच काम सुरु करता तेवढे जीव वाचवण्याची शक्यता वाढते. यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले. जेव्हा आम्हाला याची माहिती कळाली तेव्हा आम्ही तातडीनं घटनास्थळी रवाना झालो.

पण घटनास्थळी पोहोचण्यासाठी कमीत कमी १ तास लागतोच पण त्यादिवशी आम्ही ही चढाई सर्व उपकरणांच्या सहाय्यानं केवळ ४५ मिनिटांतच पूर्ण केली. आज एनडीआरएफनं ४ मृतदेह शोधून काढले पुढेही ही बचाव मोहिम सुरु राहणार आहे. पण आजचं काम थांबवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.