Motivation News : रोज पंधरा तास अभ्यास आणि खासगी शिकवणीशिवाय तयारी केलेल्या ईश्वरीची आयआयटीसाठी निवड

कोंडगावसारख्या छोट्या गावात आणि मराठी माध्यमात शिक्षण घेऊन ईश्वरीने घेतली झेप.
Ishwari Chavan
Ishwari Chavansakal
Updated on

साखरपा - कोंडगाव येथील ईश्वरी चव्हाण हिची निवड आयआयटीसाठी झाली आहे. आयआयटी गुवाहाटी इथे ती आता बायोटेक्नॉलॉजी या विषयात इंजिनिअरिंग करणार आहे.

कोंडगावसारख्या छोट्या गावात आणि मराठी माध्यमात शिक्षण घेऊन ईश्वरीने आज ही झेप घेतली आहे. शालेय शिक्षण साखरपा इथून पूर्ण केल्यावर अकरावी-बारावीसाठी ती पुण्याला गेली. तिथे शिकत असतानाच तिला बायोटेक्नॉलॉजी या विषयात आवड निर्माण झाली आणि पुढे या विषयात करिअर करण्याचं तिनं ठरवलं. पुढे पदवी शिक्षण वैभववाडी इथल्या महाविद्यालयातून घेत तिनं बी.टेक. पदवी घेतली.

पदवी पूर्ण झाल्यावर ईश्वरीचा खरा प्रवास सुरू झाला ती गेट परीक्षेच्या तयारीचा. ही परीक्षा, तिचा दर्जा याची पुरेपूर जाणीव तिला होती. त्यात ती राहत असलेल्या कोंडगावमध्ये कोणतेही मार्गदर्शक क्लासेस नाहीत. त्यामुळे तिने स्वत:च तयारी करायची, असे ठरवले. सहा महिने तिने कठोर मेहनत घेतली. त्यासाठी ती कोल्हापूर इथे जाऊन राहिली.

तिथे पेक्सर लायब्ररीत ती रोज अभ्यासासाठी जात असे. रोज सकाळी ७ ते रात्री १० हा वेळ ती लायब्ररीत अभ्यासासाठी घालवत असे. इंटरनेट हे एकमेव माध्यम ईश्वरीसाठी उपलब्ध होत. गेट परीक्षेसाठी असलेल्या विविध चॅनेलवरून तिने अभ्यास केला.

पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या वैभववाडी कॉलेजचे प्राध्यापक एस. बी. निहारकर यांनी तिला प्रोत्साहन दिल्याचे ईश्वरी सांगते. संशोधन क्षेत्रात ईश्वरीला आपली कारकीर्द घडवायची आहे. केवळ इंजिनिअर होऊन तिला थांबायचं नाही तर तिला बायोटेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टरेट करायची आहे. आयआयटीमध्ये शिकताना सेलबायोलॉजी, व्हेक्सिन यापैकी कोणत्या तरी विषयात किंवा मायक्रोस्कोप, स्टरीलायझर अशा उपकरणांवर तिची प्रोजेक्ट करण्याची इच्छा आहे. ईश्वरीचे वडील हे कोंडगाव येथे रोपवाटिका चालवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.