राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत विरोधक व सत्ताधाऱ्यांना वाढता प्रतिसाद लक्षात घेता त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली.
कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांचा २६ रोजी कुडाळमध्ये होणारा जन आशीर्वाद यात्रेचा सोहळा दिमाखात साजरा करणार आहोत. पावशी येथील सीमारेषेवर ५०० दुचाकी रॅलीसह हा सोहळा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे, अशी माहिती भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय मंत्री राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या (jan aashirvad yatra) पार्श्वभूमीवर एमआयडीसी विश्रामगृहावर तेरसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अध्यक्ष विनायक राणे, अस्मिता बांदेकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, सुमेधा पाताडे, दीप्ती पडते, बंड्या सावंत, दीपक नारकर, प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, रूपेश कानडे, राकेश कांदे, आबा धडाम, राजा धुरी, सुनील बांदेकर, विजय कांबळी, मंगेश चव्हाण, राजू माडये, राजा पडते, अजय आकेरकर आदी उपस्थित होते. तेरसे म्हणाल्या, ‘‘राणे यांची नियोजित जन आशीर्वाद यात्रा दौरा होणार आहे. तालुक्यात २६ रोजी सायंकाळी ५०० दुचाकींची रॅली असेल. ही रॅली कुडाळ भाजप कार्यालयाच्या भव्य प्रांगणात येईल. याठिकाणी राणेंची सभा होईल. त्यांचे भव्य स्वागत होईल. २७ रोजी सकाळी ‘कॉनबॅंक’ संस्थेला ते भेट देणार आहेत.
राज्य शासनाचा निषेध
राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत विरोधक व सत्ताधाऱ्यांना वाढता प्रतिसाद लक्षात घेता त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली. त्यामुळे त्यांना कोणतीही प्रक्रिया न करता अटकेची कारवाई केली. अशी कारवाई करणाऱ्या राज्य शासनाचा निषेध. त्यांचा हा दौरा पूर्ण होईलच, यात कुठलीही शंका नाही. अशा वाईट कृत्याने राज्य सरकार महाराष्ट्राचे (maharashtra) नाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.