रत्नागिरी : ढगफुटीप्रमाणे पडलेल्या मुसळधार पावसाचा (heavy rain konkna) फटका कोकण रेल्वेला (konkan railway) बसला असून वेळापत्रक कोलमडले आहे. चिपळूणातील वशिष्ठी नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलाला लागल्यामुळे सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने गाड्या त्या-त्या स्थानकावर थांबवून ठेवल्या आहेत. तेसज (tejas) आणि जनशताब्दी एक्स्प्रेस (janshatabdi express cancelled) रद्द केली तर चार गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. नऊ गाड्या आठ ते दहा तास उशिराने धावत होत्या. (konkan rain update)
अतिवृष्टी, हाय टाईड आणि कोयनेचे पाणी यामुळे वशिष्ठी नदीला पूर आला होता. चिपळूण शहर (chiplun update) आणि परिसरात प्रचंड पाणी भरले होते. वशिष्ठी नदीवरील रेल्वेच्या पुलाला पाणी लागले होते. या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे पुराचा धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. खेर्डी स्थानकासह आजुबाजूच्या परिसरातील रुळावरुन पाणी वाहत होते. रुळच दिसत नव्हते. मंगरुळ-सीएसटीएम कामथेला, एर्नाकुलम-निजामुद्दीन संगमेश्वरला, अमृतसर रत्नागिरीत, तिरुवअनंतपूरम विलवडेत, तिरुवनेली-दादर राजापूरात, तिरुवअनंतपुरम वेर्णा स्थानकात, मांडवी मडगावला तर दादर-सावंतवाडी चिपळूण, मुंबई-मडगाव जनशताब्दी खेड स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती.
सायंकाळपर्यंत पुराचे पाणी ओसरले नाही. त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प होती. निजामुद्दीन-एर्नाकुलम आणि ओखा एक्स्प्रेस अन्य मार्गाने वळवण्यात आला. मुंबईतून निघणारी आणि मडगावकडे जाणारी तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या बिघडलेले वेळापत्रक केव्हा सुरळीत होईल हे सांगणे अशक्य असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक गेले सात दिवस विस्कळीत झाली आहे. ओल्ड गोवा टनेलमध्ये माती आल्यामुळे तीन दिवस वाहतूक विस्कळीत होती. पुढील दोन दिवस मुंबईत पाऊस झाल्यामुळे गाड्या उशिराने धावत होत्या. कोकणात मुसळधार पाऊस पडत असल्याने अजुन दोन दिवस वेळापत्रक असे राहील अशी शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.